आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Player Dustin Brown’S Girlfriend Dione Gonzales Photos

एका मॅचने बनवले हिरो, 19 वर्षांपासून कापले नाहीत केस; जर्मन मॉडेल गर्लफ्रेंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जर्मन खेळाडू डस्टिन ब्राउन दोन वेळा विम्बल्डन विजेता असलेल्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्‍पर्धेत पराभूत करून हिरो झाला आहे. 102 रॅकिंगवर असलेल्या ब्राउनने 14 वेळा ग्रँडस्लॅमचा विजेता असलेलेल्या नदालला 7-5, 3-6, 6-4, 6-4 फरकाने पराभूत केले. या विजयामुळे ब्राउन स्पर्धेत तिसऱया स्‍थानी पोहोचला; तर नदाल स्‍पर्धेबाहेर. त्‍यामुळे ब्राउन चर्चेत आला आहे. ब्राऊनच्या पर्सनल लाइफचा विचार केल्यास, त्याचे वडील जमैकाचे होते तर आई जर्मन. करिअरच्या सुरुवातीला ब्राउन काही काळ जमैकासाठी खेळला, परंतु नंतर जर्मनीला परत आला. टेनिस जगतामध्ये तो आपल्या 6 फुट 5 इंचाच्या लांब केसांमुळेसुद्धा ओळखला जातो. त्‍याने 19 वर्षापासून केस कापलेले नाहीत. त्‍याला टॅटू गोंदवून घेण्‍याचा छंद आहे.

जर्मन मॉडेलसोबत करत आहे डेटिंग
ब्राउन सध्या जर्मन मॉडेल डीओन गोंजल्ससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सामना संपताच डीओनने ट्विटरवरून ब्राउनला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 33 वर्षीय डीओन लासवेगासला वास्तव्यास आहे. ऑनलाइन रेकॉर्डनुसार डीओनचे लग्न 21 डिसेंबर, 2002 मध्ये जोनाथनसोबत झाले होते. त्यावेळी जोनाथन 23 आणि डीओन 21 वर्षांची होती. जोनाथनपासून डीओनला एक मुलगी आहे.

डस्टिन ब्राउन
>8 डिसेंबर 1984 ला जन्म
>वडील जमैकाचे तर आई जर्मन
>1996 मध्‍ये ब्राउन जमैकाला गेला.
>जमैकाकडून तो काही काळ खेळलासुध्‍दा
>हँडबॉल, फुटबॉल आणि जूडोही त्‍याने खेळून पाहिले.

पुढील स्लाईड्सवर पाहा, डस्टिन ब्राउन आणि डीओन गोंजल्सचे काही निवडक फोटो....