आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीनंतर टेनिसपटू मारिया शारापोवाचे आज कोर्टवर पुनरागमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 स्टुटगार्ट- रशियाची ३० वर्षीय स्टार टेनिसपटू मारिया शारापोवा बुधवारी १५ महिन्यांची बंदीची शिक्षा पूर्ण करून कोर्टवर पुनरागमन करत आहे. तिला स्टुटगार्ट ओपन टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्डने प्रवेश मिळाला आहे. पहिल्या फेरीत तिचा सामना इटलीच्या रॉबर्टो विन्सीशी होईल. बंदी असलेले औषध मेलडोनिअमचे सेवन केल्याप्रकरणी शारापोवा डोपिंगमध्ये अडकली होती. आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने मागच्या वर्षी तिच्यावर बंदीची शिक्षा जाहीर केली होती. तिची बंदीची शिक्षा बुधवारी संपत आहे. तिला टेनिस कोर्टवर प्रवेशाला परवानगी नव्हती. यामुळे तिने जर्मनीतील खासगी कोर्टवर सराव केला. बंदीमुळे शारापोवाचे जवळपास १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतरही तिचे नेटवर्थ जवळपास १३०० कोटी रुपये इतके आहे.  
 
पुन्हा सोबत येण्यास नाइकी तयार :  १५ महिन्यांच्या बंदीच्या वेळी नाइकीने सर्वांत  आधी शारापोवाचा करार संपवला. यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी तिच्याशी करार रद्द केला. २५ कोटी रुपये स्पर्धेत न खेळल्याने झाले, तर उर्वरित ७५ कोटी रुपये नाइकी, टॅग ह्युअर, पोर्शे यांसारख्या कंपन्यांचे करार रद्द झाल्यामुळे झाले. दरम्यान, नाइकीने पुन्हा शारापोवाशी करार करण्यास रस दाखवला आहे.   
 
यामुळे यशस्वी पुनरागमन शक्य  
- द इकॉनॉमिस्टच्या अहवालानुसार ३० वर्षांत टॉप-२० खेळाडूंत सामील २२ महिला खेळाडू ६ किंवा त्यापेक्षा अधिक काळ कोर्टपासून दूर होत्या. पुनरागमनानंतर पहिल्या ५ सामन्यांत ७५ टक्के खेळाडूंनी विजय मिळवला. बंदीच्या वेळी शारापोवाची क्रमवारी ७ होती.  
- स्पर्धेत अव्वल मानांकित सेरेना गर्भवती असल्याने खेळणार नाही. अजारेंकासुद्धा आई होणार असल्याने स्पर्धेबाहेर आहे. अँजोलिक कर्बरने या वर्षी एकही किताब जिंकलेला नाही. तुलनेने दुबळ्या खेळाडूंशी शारापोवाचा सामना होऊ शकतो. यामुळे विजय शक्य आहे.
बातम्या आणखी आहेत...