विंबल्डन संपल्यानंतर टेनिसस्टार्स सध्या रिलॅक्स पहायला मिळत आहेत. सानिया मिर्झा, सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा
आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. सानियाने नुकतेच जिममध्ये वर्कआउट करतानाचे काही फोटो शेयर केले आहेत. विंबल्डन जिंकल्यानंतर सानिया स्वदेशात परतली होती. आपल्या कुटूंबासोबत तिने र्इद साजरी केली. आता 31 ऑगस्टपासून सुरू होणा-या यूएस ओपनमध्ये ती दिसणार आहे.
हैद्राबादेत कुटूंबासोबत ईद साजरी केल्यानंतर सानिया पती शोएब मलिकला चीयर करण्यासाठी कोलंबोला (श्रीलंका) गेली होती. येथे पाकिस्तान क्रिकेट टीमने श्रीलंकेवर विजय मिळवल्याने सानियाने जल्लोषही साजरा केला. सध्या तिने आपल्या ट्विटरवर जिममधील फोटो शेयर केली आहेत. यासोबत तिने लिहले ओ 'यू वर्क हार्ड... यू प्ले बेटर' म्हणजे तुम्ही कष्ट घ्याल, तर उत्तम खेळू शकाल. अमेरिकन टेनिसस्टार सेरेना विल्यम्स, रशियन स्टार मारिया शारापोवा यांनीही फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर सुटी साजरी करतानाचे काही फोटो शेयर केले आहेत. शारापोवा काही दिवसांपासून बीचवर आपल्या सुट्या घालवत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, टेनिसस्टार्सनी कोणते फोटो शेयर केलेंडर आहेत..