आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Umpire Eva Asderaki Famous For Her Beauty

फॅन म्हणाला, तुझे केस सुंदर आहेत, कोणता शॅम्पू लावते; सौंदर्यवती आहे ही टेनिस एम्पायर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युएस ओपन फायनल. नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांच्यामधील थरारक सामना. पण या सामन्यातही दोघांव्यतिरिक्त एक व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु होती. स्टेडियममध्ये ती आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली होती. सोशल मीडियावरही ही चर्चा दिसून येत होती. या व्यक्तीचे नाव आहे चेअर एम्पायर इवा दस्देराकी. 33 वर्षीय इवाने या सामन्यात एम्पायरींग केली. यासह ती युएस ओपनच्या महिला आणि पुरुष सिंगल्स फायनलमध्ये एम्पायरींग करणारी पहिली महिला एम्पायर झाली.
आणि मॅकेनरो म्हणाले- शी इज ऑन फायर
ग्रीक एम्पायर इवाने युएस ओपनच्या फायनलमध्ये केलेल्या आठही कॉल्सला खेळाडूंनी आव्हान दिले. यावेळी प्रत्येक वेळी तिचा कॉल खरा ठरला. अशाच एका कॉलवर कॉमेंट्रेटर जॉन मॅकनरो म्हणाले, की शी इन ऑन फायर. टेनिस पत्रकार एंगुएन हिने लिहिले, की टर्नामेंट खतम झाली. नोवाक चॅम्पिअन ठरला. पण ट्रॉफी इवाला मिळाली.
सौंदर्याचे दिवाने प्रशंसक
सोशल मीडियावर इवावर कायम चर्चा सुरु असते. केवळ तिच्या क्षमतेवर नव्हे तर तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा आहेत. एका चाहत्याने विचारले होते, की तुझे केस फार सुंदर आहेत. शॅम्पू कोणता लावतेस. इवाने याचेही उत्तर दिले होते.
गोंधळ घातल्याने विरोधी खेळाडूला दिला प्वॉईंट
इवा फार शिस्तप्रिय आहे. एकदा असे झाले, की युएस ओपन 2011 मध्ये सेरेना विलियम्स हिने समांता स्तोसुर विरुद्ध शॉट मारला. समांता शॉट खेळणार तेवढ्यात सेरेना ओरडली, कम ऑन. इवाने हे नियमाच्या विरुद्ध असल्याचे सांगितले. समांताला पॉईंट दिला.
लहानपणी होती जिमनॅस्ट
इवा सहा वर्षांची होती तेव्हा रिदमिक जिम्नॅस्टिक शिकत होती. परंतु, 11 वर्षांची होईस्तोवर टेनिसने तिचे हृदय जिंकले. 16 वर्षांची झाल्यावर टॉप-8 खेळाडूंमध्ये तिचा समावेश झाला. 1997 मध्ये ती पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळली. त्यानंतर ती लाईन जज झाली. इवा सांगते, की मी बऱ्याच लोकांना भेटली. त्यांच्याकडून ऐकलेल्या रोमांचाने मी एम्पायर होण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईडवर बघा, इवाच्या सौंदर्याचे का फॅन आहेत प्रेक्षक सिद्ध करणारे फोटो....