आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच अाेपन चॅम्पियन वावरिंकाच्या बिग-४ मधील एन्ट्रीने वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंच अाेपन चॅम्पियन स्टन वावरिंका हा खरेच बिग-४ च्या क्लबमध्ये सहभागी हाेण्याचा दावेदार अाहे का? स्वीसच्या खेळाडूने फ्रेंच अाेपनचा किताब जिंकल्यानंतर या वादाला ताेड फुटले. वावरिंका स्वत:ला यासाठी पात्र मानत नाही. ‘अशी प्रतिक्रिया देऊन वावरिंका या स्वत:चा अवमान करत अाहेे,’ असे मत अँडरसनने व्यक्त केले. उल्लेखनीय कामगिरी व अजिंक्यपदामुळे त्याचे महत्त्व सिद्ध हाेते. यात फेडरर, नदाल, याेकाेविक व मरेचा समावेश अाहे.

५ वर्षे फेडरर, मरेवर भारी
स्टॅनने गत पाच वर्षांत राॅजर फेडरर व मरेच्या बराेबरीने ग्रँडस्लॅम (दाेन) जिंकले अाहेत. यात केवळ नदाल (८) व याेकाेविक (७) अाघाडीवर अाहेत. स्टॅनच्या नावे अाॅलिम्पिक सुवर्ण अाणि डेव्हिस चषक किताबाची (सांघिक) नाेंद अाहे.

बॅकहँडमध्ये सर्वात तरबेज
अाठव्या वर्षापासून टेनिसचे काेचिंग घेण्यास सुरुवात केली. १७ व्या वर्षी फ्रेंच अाेपन ज्युनियरमध्ये चॅम्पियन बनला. सुरुवातीला फाेरहँड दुबळे हाेते. मात्र, अाता नाही. स्टॅनची वनहँडेड अाणि बॅकहँडची शैली सध्याच्या खेळाडूंत सरस अाहे.
बातम्या आणखी आहेत...