आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • The Czech Player Had Lost In The Wimbledon Final In 1993 And 1997 Before Winning The Grand Slam Tournament In 1998

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

49व्या वर्षी या टेनिस स्टारचे निधन, विम्बलडनमध्ये रडल्याने झाली होती प्रसिद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- नोवोत्ना 1993 आणि 1997 मध्ये विम्बलडनच्या फायनलमध्ये दोनवेळा हरली होती. - Divya Marathi
- नोवोत्ना 1993 आणि 1997 मध्ये विम्बलडनच्या फायनलमध्ये दोनवेळा हरली होती.

प्राग : माजी विम्बलडन चॅम्पियन जाना नोवोत्ना हिचे वयाच्या 49व्या वर्षी निधन झाले. चेक रिपब्लिकची टेनिस स्टार नोवोत्ना मागील अनेक वर्षापासून कर्करोगाने ग्रस्त होती. तिच्या 14 वर्षाच्या करीअरमध्ये 17 ग्रँडस्लॅम पटकावले होते. त्यामध्ये एक सिंगल आणि 16 डबल्सचा समावेश आहे.

 

विम्बलडन हारल्यावर रडली होती...
- नोवोत्ना 1993 आणि 1997 मध्ये विम्बलडनच्या फायनलमध्ये दोनवेळा हरली होती. 1993 मध्ये जर्मन टेनिस स्टार स्टेफी ग्राफीसोबत हरल्यानंतर ती खूप रडली होती. त्यानंतर नोवोत्ना चर्चेत आली हेाती.

- कॅथरीनने यावेळी म्हटले होते की, तु याठिकाणी नक्कीच जिंकशील. पण पराभवाला सामोरे गेल्याने ती अत्यंत निराश झाली होती. पुढच्या दिवशी कॅथरीन आणि जानाचे फोटो सर्व वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते.

 

पाच वर्षांनी मिळाले यश
- 1993 आणि 1997 मध्ये विम्बलडन फायनलमध्ये पराभव पत्करल्यानंतर 1998 मध्ये एकमात्र संगल्समध्ये ग्रँडस्लॅम किताब तिने जिंकला. यामध्ये तिने फ्रान्सच्या नताली तॉजिएटला हरविले होते. 
- जानाने 1999 मध्ये टेनिसपासून सन्यास घेतला. सन्यास घेतलेला असला तरीही ती शेवटपर्यंत टेनिस खेळत होती. पुढे तिने कमेंट्री आणि प्रशिक्षण देण्याचेही काम केले.


WTA, CEO कडून श्रद्धांजली

- वुमेन्स टेनिस असोसिएशनचे चीफ स्टीव सायमन म्हणाले की, जे लोक नोवोत्नाला ओळखत होते, त्यांच्यासाठी ती ऑन आणि ऑफ इन्सपिरेशन राहिल. ती टेनिसच्या इतिहासात कायम चकमत राहिल.

 

पुढील स्लाईडवर पाहा - PHOTOS

बातम्या आणखी आहेत...