आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्यासाठी अाॅफिसमध्ये धावत जात हाेता, अाता अमेरिकेत सर्वात वेगवान भारतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वजन कमी करण्याच्या उद्देशाने धावण्यास सुरुवात करणाऱ्या मुंबईच्या विकास मलिकलाही वाटले नसेल, की अापण एक दिवस सर्वात वेगवान धावपटू ठरू. अमेरिकेत राहणाऱ्या विकासने नुकतीच शिकागाे येथील हेनेनपिन हंड्रेड अल्ट्रा मॅरेथाॅन रनिंग इव्हेंट (१०० मैल रेस) पूर्ण केली. त्याने १६ किमीचे अंतर १८ तास २० मिनिटांमध्ये पूर्ण केले. ही रेस सर्वात कमी वेळेत पूर्ण करणारा विकास हा पहिला भारतीय सर्वात वेगवान धावपटू ठरला अाहे. त्याने किरेन डिसूजच्या १८ तास ४५ मिनिटांच्या विक्रमाला मागे टाकले. अाता विकास मलिक हा जगातील सर्वात कठीण १०० मैल रेस म्हणजेच वेस्टर्न एस्टेट एंड्युरन्स रेसची तयारी करत अाहे.   

मूळ शामली (उत्तर प्रदेश) येथे राहणाऱ्या विकासचा संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी अाहे. ‘मी २०११ मध्ये अमेरिकेमध्ये वास्तव्य केले. यादरम्यान वाढलेल्या वजनचा प्रश्न मला सारखा भेडसावत हाेता.त्या वेळी माझे ९५ किलाे वजन  हाेते. हे कमी करण्याचा माझ्यासमाेरचा सर्वात माेठा प्रश्न हाेता. त्यामुळे मी धावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक मैल धावण्यास सुरुवात केली. यासाठी मला माेठी कसरत करावी लागली. मात्र, हळूहळू मी यामध्ये चांगल्या प्रकारे धावू लागलाे. त्यामुळे माझा अात्मविश्वास वाढू लागला. यादरम्यान मी मॅरेथाॅनमध्ये धावण्यास सुरुवात केली. पहिल्याच रेसमध्ये मला माेठ्या प्रमाणात थकवा जाणवला. ही रेस मी ३ सात ३२ मिनिटांमध्ये पूर्ण केली,’असेही त्याने या वेेळी सांगितले.  
 
 
२०१४ मध्ये १०० मैलांची रेस
विकास मलिकने कमी अंतरावर पळण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने २०१४ मध्ये १०० मैलची रेसमध्ये सहभाग घेतला. मात्र, त्याला ७० मैलांपर्यंतच मजल मारता अाली. त्यानंतर मात्र त्याने ही रेस पूर्ण करण्याचे मनाेमन ठरवले. यातून त्याने सहा महिन्यांत ही रेस १८ तास २० मिनिटांत पूर्ण करण्याचा विक्रम नाेंदवला.
बातम्या आणखी आहेत...