आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना विल्यम्स भगिनी बनवण्याचे स्वप्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - ब्रिस्बेनचा रे वूड फुटबॉल क्लब लिव्हरपूलचा चाहता आहे. तो लिसेस्टर आणि पॅरिस सेंट जर्मन क्लबला कोचिंग देतो. मात्र, आपल्या दोन्ही मुलींना तो टेनिसपटू बनवू इच्छितो. त्याची सात वर्षीय मुलगी लिविनियाने तर टेनिसची प्रॅक्टिस सुरू केली आहे. त्याची दुसरी मुलगी सध्या दोन वर्षांचीच आहे. तो आणखी एक वर्षाने तिला टेनिसचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करेल. भविष्यात या दोन्ही मुलींना सेरेना-व्हीनस विल्यम्स भगिनींप्रमाणे प्रसिद्धी मिळावी असे त्याला वाटते. लिविनियाला तर माजी टेनिसपटू मार्गेट कोर्टला मागे टाकायचे आहे. जवळपास एक दशकानंतर या दोन्ही मुली टेनिसमध्ये चॅम्पियन बनतील, असा विश्वास वूडला आहे.

वूड म्हणतो, "मी सेरेना व व्हीनसची माहिती मिळवली आहे. त्या दोघींचे वडील रिचर्ड विल्यम्स आपल्या मुलींना टेनिस कसे शिकवायचे हे मी समजण्याचा प्रयत्न केला. रिचर्ड स्वत:च बालपणी मुलींना ट्रेनिंग देत असत. मीसुद्धा तसेच ट्रेनिंग देऊ इच्छितो. भविष्यात माझ्या मुलींना "वूड सिस्टर्स' नावाने ओळखले जावे, असे मलासुद्धा वाटते.' लिविनिया सध्या आठवड्यात १२ तास ट्रेनिंग घेते. ती सेरेना आणि योकोविकची फॅन आहे. मी तिला टेनिससोबत जिम्नॅस्टिक व अॅथलेटिक्सचा सराव देतो. यामुळे बॅलन्स आणि समन्वय वाढतो.

लिविनियात टेनिसची आवड वाढत आहे. ती सुट्यांतसुद्धा टेनिस खेळते. कधी कधी तिची खेळण्याची इच्छा नसते तेव्हा मी फक्त तिला सर्व्हिस करण्याचे सांगतो. सर्व्हिस करताना बॉलने ती फुगे फोडते. खेळता खेळता सरावासह तिचे मनोरंजनही होते. काही दिवसांपूर्वी मी लिविनियाचे रजिस्ट्रेशन हेविटच्या टॅलेंट सर्च एजन्सीत केले आहे. याशिवाय मी काही व्हिडिओ नदालच्या अकादमीलाही पाठवले आहेत. तिथे तिची निवड झाली तर आम्ही स्पेनला स्थायिक होऊ, असे वूड म्हणाला. माझी दुसरी मुलगी दोन वर्षांची आहे. तिनेसुद्धा प्लास्टिकच्या टेनिस रॅकेटने खेळण्यास सुरुवात केली आहे,असे ती म्हणाली.
बातम्या आणखी आहेत...