आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The First Quarterfinal Match Will Be Played At The Guwahati Ground Tomorrow

गुवाहाटीच्या मैदानावर उद्या रंगणार पहिला उपांत्यपूर्व सामना; इंग्लंड-अमेरिका सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी/मडगाव- सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या दाेन वेळच्या चॅम्पियन घाना युवांची नजर अाता फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाकडे लागली अाहे. यासाठी घानाचे युवा खेळाडू उत्सुक अाहेत. घानाचा अंतिम अाठमधील सामना शनिवारी माली टीमशी हाेणार अाहे. गुवाहाटीच्या मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. दुसरीकडे गाेव्याच्या मैदानावर इंग्लंड अाणि अमेरिकन युवा टीममध्ये दुसरा उपांत्यपूर्व सामना रंगणार अाहे. या सामन्यातील विजेत्या खेळाडूला उपांत्य फेरीतील अापला प्रवेश निश्चित करण्याची संधी अाहे.     

दाेन वेळच्या चॅम्पियन घानाने गत सामन्यात युवा नाइजरचा पराभव केला. यासह घानाच्या युवांनी अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. अायिह अाणि डान्साे यांच्या सुरेख खेळीच्या बळावर घानाने या सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली. यामुळे नाइजरच्या युवा टीमला ०-२ अशा फरकाने पराभवाला सामाेरे जावे लागले. या पराभवामुळे नाइजरला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दुसरीकडे धडाकेबाज विजयासह घानाने पुढची फेरी गाठली. घानाची स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक ठरली. या टीमला गटातील पहिल्या दाेन्ही सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. मात्र, त्यानंतर गटातील तिसऱ्या सामन्यात घानाने यजमान भारताचा पराभव केला. यातील विजयाच्या बळावर घानाला नाॅकअाऊटमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. त्यानंतर घानाने नाइजर टीमवर मात केली अाणि अंतिम अाठमध्ये प्रवेश केला.   

दुसरीकडे मालीच्या युवांनी सरस खेळी करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला. अाता या टीमच्या युवांनी उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी कंबर कसली अाहे.

इंंग्लंड-अमेरिका सामना रंगणार
गाेव्याच्या मैदानावर शनिवारी इंग्लंड अाणि अमेरिकन युवा टीमचा उपांत्यपूर्व सामना रंगणार अाहे. या दाेन्ही युवांची स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली अाहे. त्यामुळे त्यांना  अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित करता अाला. अाता इंग्लंड अाणि अमेरिकेचे युवा खेळाडू उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी उत्सुक अाहे. यासाठी त्यांनी कसून सराव केला. यामुळे या सामन्यातील विजयासाठी या दाेन्ही टीममध्ये राेमांचक सामना हाेईल. फाॅर्मात असलेल्या अमेरिकन युवांनी गत सामन्यात पराग्वेचा पराभव केला. या टीमने ५-० ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर अमेरिकेला स्पर्धेत दबदबा निर्माण करता अाला. 

माली फाॅर्मात
नाॅकअाऊटमधील धडाकेबाज विजयाने मालीचे युवा खेळाडू फाॅर्मात अाहे.  या युवांनी गत सामन्यात इराकचा पराभव केला. मालीने मडगावच्या मैदानावर झालेला हा सामना ५-१ अशा फरकाने जिंकला. त्यामुळे मालीच्या युवांनी अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अाता विजयाची ही धडाकेबाज लय कायम ठेवण्याचा मालीचा प्रयत्न असेल. यासाठी मालीचे खेळाडू उत्सुक अाहेत.  
बातम्या आणखी आहेत...