आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्सासच्या अब्जाधीशाने 17,640 काेटींत खरेदी केली ह्युस्टन राॅकेट्स टीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन- अमेरिकन बास्केटबाॅल लीग एनबीएच्या इतिहासातील सर्वात महागडे डील मंगळवारी झाले. एनबीए टीम ह्यूस्टन राॅकेट्सला अब्जोपती उद्याेजक टिलमेन फेरटिटाने २.७५ बिलियन डाॅलरमध्ये (१७६४० काेटी) खरेदी केले. ही एनबीएच्या टीमवर लावण्यात अालेली सर्वाधिक बाेली ठरली. त्यामुळे ही टीम सर्वात महागडी ठरली अाहे.   

यापूर्वी २०१४ मध्ये स्टीव्ह बालमरने लाॅस एंजलिस क्लिपर्सला २ बिलियन डाॅलरमध्ये खरेदी केले हाेते. म्हणजे ह्युस्टन राॅकेट्स  २ बिलियन डाॅलरपेक्षा अधिक दरात विकली गेलेली एनबीएच्या इतिहासातील दुसरी टीम ठरली.  
 
फेरटिटाने लेस्ले अलेक्झांडरकडून हा संघ खरेदी केला हाेता. लेस्लेने १९९३ मध्ये या टीमची स्थापना केली. यानंतर टीमने एनबीएमध्ये अल्पावधीत साेनेेरी यशाची कमाई केली.
 
यादरम्यानही फेरटिटाने या संघ खरेदीची इच्छा व्यक्त केली हाेती. यासाठी त्यांनी १०१ मिलियन डाॅलरची (६४७ काेटी) बाेली लावली हाेती. त्यानंतर या टीमचे व्हॅल्यू वाढत गेले अाणि अाजच्या घडीला या टीमने विक्रमी अाकडा गाठला. 
 
ह्युस्टन राॅकेट्स १.६५ बिलियन डाॅलरच्या (१०५८२ काेटी) व्हॅल्यूसह एनबीएची अाठवी माेस्ट व्हॅल्युएबल संघ अाहे. या टीमची कमाई २४४ मिलियन डाॅलर (१५६५ काेटी) अाहे. 
 
-२३ वर्षांपूर्वी याच टीमवर लावली हाेती ६४७ काेटींची बाेली 
-१०५८२ काेटींच्या व्हॅल्यूसह राॅकेट्स ठरली एनबीची अाठवी सर्वात माेस्ट व्हॅल्युएबल टीम 
-५५ गेम जिंकले गतसत्रात ८२ पैकी 
-०२ वेळा चॅम्पियनशिप जिंकली अाहे टीमची 
-१.५३ लाख काेटी रुपयांचे डील एनबीएने केले ईएसपीएन-टर्नर स्पाेर्ट््ससाेबत 
-०९ वर्षांसाठीच्या या डीलमधून तिप्पट महसूल
बातम्या आणखी आहेत...