आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुगुरुजा विम्बल्डनची नवी राणी; व्हीनसचा पराभव, फेडररला अाज अाठव्या किताबाची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - स्पेनची २३ वर्षीय टेनिसस्टार गार्बिने मुगुरुजा सत्रातील तिसऱ्या  ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत चॅम्पियन ठरली. तिने शनिवारी महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने फायनलमध्ये पाच वेळच्या चॅम्पियन व्हीनस विल्यम्सचा पराभव केला. १४ व्या मानांकित मुगुरुजाने १ तास १७ मिनिटांत ७-५, ६-० अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. यासह तिला अापल्या नावे दुसऱ्या  ग्रँडस्लॅम किताबाची नाेंद करता अाली.   
 
पराभवामुळे माजी नंबर वन व्हीनसला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिने सहाव्या किताबासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. याशिवाय तिचे अाठवे  ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्नही भंगले. तिला पुन्हा विजयी कामगिरी जमली नाही. 
 
स्पेनच्या मुगुरुजाने दमदार सुरुवात करताना व्हीनसला राेखण्यासाठी शर्थीची झुंज दिली. दरम्यान तिला पहिल्या सेटवर माेठी झुंज द्यावी लागली. दाेन्ही खेळाडूंमधील सरस खेळीमुळे हा सेट ट्रायबेकरपर्यंत खेचल्या गेला. मात्र, यात स्पेनची युवा खेळाडू वरचढ ठरली. तिने सरस सर्व्हिसच्या बळावर पहिला सेट ७-५ ने जिंकून लढतीत अाघाडी मिळवली. यादरम्यान व्हीनसने केलेला प्रयत्न अपुरा ठरला. त्यानंतर मुगुरुजाने हीच लय कायम ठेवताना सहज दुसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.   
 
मुगुरुजाचा दुसरा ग्रँडस्लॅम 
स्पेनच्या २३ वर्षीय टेनिसस्टार गार्बिने मुगुरुजाने अापल्या करिअरमध्ये दुसरा ग्रँडस्लॅम किताब  पटकावला. यापूर्वी तिने गतवर्षी २०१६ मध्ये फ्रेंच अाेपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकावले हाेते. त्यानंतर अाता तिने विम्बल्डनची ट्राॅफी अापल्या नावे केली. तिला गत २०१५ मध्ये विम्बल्डनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते.
 
फेडररला अाज अाठव्या किताबाची संधी!
विम्बल्डनची फायनल गाठणारा स्विसकिंग राॅजर फेडरर हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. अाता त्याला विक्रमी अाठव्या विम्बल्डन किताबाला अापल्या नावे करण्याची संधी अाहे. त्याचा अंतिम सामना क्राेएशियाच्या मरिन सिलीचशी हाेईल. त्याने अातापर्यंत अापल्या करिअरमध्ये एकूण १८ ग्रँडस्लॅम किताब जिंकले अाहेत. त्याने ११ वेळा विम्बल्डन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. फेडररने १४ वर्षांपूर्वी मार्कला हरवून पहिल्यांदा विम्बल्डनची ट्राॅफी पटकावली हाेती.
बातम्या आणखी आहेत...