आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या शुक्रवारी, पदाधिकाऱ्यांना दूर करण्याच्या मागणीवर होणार निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बीसीसीआयचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज तहकूब केली. बीसीसीआयच्या आणि संलग्न राज्य संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावरील पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी (९ डिसेंबर) होईल.

लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास बीसीसीआय गेले ५ महिने टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजीच्या आदेशानंतरही आणखी दोन वेळा आदेश दिले. त्यानुसार राज्य संघटनांकडे मोठा निधी हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात आला. लोढा समितीने बीसीसीआयच्या व संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दूर करणे व माजी गृहसचिव जी. के. पिल्ले यांची निरीक्षकपदी नियुक्ती करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यावर आता येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आझाद यांची मागणी
लोढा समितीने बीसीसीआयसाठी लागू केलेल्या शिफारशी भारतातील अन्य खेळांसाठीही लागू कराव्यात, अशी सूचना माजी कसोटीपटू व भाजपाचे बडतर्फ खासदार कीर्ती आझाद यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...