आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Undertaker Makes Surprise Return, Lays Waste To Brock Lesnar

PHOTOS: डेडमॅन व लेसनरमध्‍ये जुंपली कुस्‍ती, फाेटोत पाहा 30 पहिलवानांना दोघे आवरेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डबल्यू.डबल्यू.ई.च्‍या एका सामन्‍यादरम्‍यान दोघांमध्‍ये चांगलीच कुस्‍ती भिनकली. सेठ रोलिंस आणि ब्रॉक लेसनर याचा सामना सुरू असताना अंडरटेकरने धडाकेबाज एंट्री केली नि लेसनरसोबत त्‍याची चांगलीच जुंपली. तेव्हा या सामन्‍याचा माहोल भयानक झाला होता.
आपल्‍या चाहत्‍यांमध्‍ये 'डेडमॅन' नावाने प्रसिद्ध असलेल्‍या अंडरटेकरने जबरदस्त एंट्री करून सर्वांना चकित केले. तेव्‍हा लेसनर आणि डेडमॅन दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते. WWE चे व्हाइस प्रेसिडेंट ट्रिपल एच यांनी त्‍या दोघांना वेगळे करण्‍यासाठी पहिलवानांना निमंत्रित केले. मात्र, तब्‍बल तिसपेक्षा अधिक पहिलवान त्‍यांना सोडवू शकले नाहीत. सुमारे अर्धा तास त्‍यांच्‍यात ही लढाई चालली.
अंडरटेकरने का केला हल्‍ला
7 एप्रिल 2014 मध्‍ये ब्रॉक लेसनरने अंडरटेकरला हरवून रेसलमेनियाचा पुरस्‍कार जिंकला होता. ही पहली संधी होती जेव्‍हा अंडरटेकर रेसलमेनियामध्‍ये हरला होता. संधीच्‍या शोधात असलेल्‍या डेडमॅनला जसे कळाले की, ब्रॉक लेसनर आणि सेठ रोलिंस रिंगमध्‍ये उतरत आहेत. तेव्‍हाच त्‍याने धमाकेबाज एंट्री करत सर्वांना आश्‍चर्यचकीत करून सोडले.
रिंगनंतर बॅकस्टेजला झाली लढाई
ब्रॉक लेसनर आणि अंडरटेकर यांच्‍या कुस्‍तीला आधी रिंगमध्‍ये सुरूवात झाली. दोघांना विलगही करण्‍यात आले होते. मात्र, दोघेही परत जाताना पुन्‍हा एकदा बॅकस्‍टेजवर भिडले. यावेळी 50 वर्षीय डेडमॅनचा उत्‍साह पाहण्‍यासारखा होता.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, कुस्‍तीचा थरार..