आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • The World No. 772 Lost 6 0, 6 3, 6 4 During Match On Centre Court With No.3 Federer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पराभवानंतरही विजेत्यासारखा जल्लोष, गर्लफ्रेंडने दिला फ्लाईंग किस, वाचा का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पराभवानंतरही मार्कस विलिस नारा न होता विजेत्यासारखा जल्लोष करीत होता तर त्याची गर्लफ्रेंड जेनिफरने त्याला सामन्यानंतर असा फ्लाईंग (इनसेट) किस दिला. - Divya Marathi
पराभवानंतरही मार्कस विलिस नारा न होता विजेत्यासारखा जल्लोष करीत होता तर त्याची गर्लफ्रेंड जेनिफरने त्याला सामन्यानंतर असा फ्लाईंग (इनसेट) किस दिला.
लंडन- महान टेनिसपटू रॉजर फेडररने भलेही पार्ट टाईम कोच आणि खेळाडू मार्कस विलिसचे स्वप्न भंग करत विम्बंल्डन टेनिस टूर्नामेंटच्या तिस-या फेरीत प्रवेश केला असला तरी मार्कस विलिस आणि त्याची गर्लफ्रेंड या पराभवामुळे जरा ही निराश दिसले नाहीत. या जोडीने पराभवाला खूपच सहज स्वीकारले व कोर्टवरच सेलिब्रेशन सुद्धा केले.
पराभवानंतर काय केले मार्कसने...
- जागतिक क्रमवारीत 772 व्या स्थानी असलेला ब्रिटिश टेनिसपटू मार्कस विलिस दुस-या फेरीनंतर रातो-रात स्टार झाला होता.
- पुढच्या फेरीत त्याचा मुकाबला जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेल्या रॉजर फेडररसोबत होता. ज्यात फेडररने विलिसला सलग अशा 6-0, 6-3, 6-4 तीन सेटमध्ये हरवले.
- मात्र, मार्कस मॅस हारल्यामुळे थोडा दु:खी झाला मात्र त्यानंतरही तो बिलकूल निराश दिसत नसता. पराभवानंतर तो खूपच आनंदी दिसत होता.
- खरं तर रॉजर फेडरर हाच मार्कस आवडता खेळाडू आहे. तसेच त्याच्यापासून त्याने प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात पराभव होताना त्याला फार दु:ख झाले नाही.
- तिकडे मार्कसच्या पराभवानंतर त्याची गर्लफ्रेंड जेनिफर बेट सुद्धा निराश दिसली नाही. ती याचमुळे खूप खूष होती की मार्कस दुस-या फेरीत पोहचला व त्याला रॉजर फेडररसोबत खेळायला मिळाले.
- जेनिफरने संपूर्ण मॅचदरम्यान मार्कसला खूप चीयर केले. तसेच मार्कसचा पराभव झाल्यानंतरही तिने त्याला फ्लाईंग किस करीत विश केले.
- केवळ जेनिफरच्या सांगण्यावरूनच मार्कसने विम्बंल्डनच्या क्वालिफायर राउंडमध्ये सहभाग घेतला होता.
फेडररविरोधात जिंकायचे होते मार्कसला-
- मॅच संपल्यानंतर विलिस म्हणाला, हे थोडे मजेशीर वाटेल पण फेडररकडून हारल्यानंतर मी दु:खी झालो. ते काम खूप कठिण होते. मात्र, मी सामन्यादरम्यान खूपच सावध होतो तसेच मी चांगला खेळही करीत होतो. मात्र, या सामन्यानंतर मी एक बियर पिण्याचा हक्क मिळवला आहे. - काही महिन्यापूर्वी लहान मुलांना व प्रौढांना प्रशिक्षण देणा-या विलिसविरोधात सामना होत असल्याने फेडररने आनंद व्यक्त केला होता.
- या विजयानंतर फेडरर म्हणाला, मला माहित होते की, विलिसविरोधातील सामना वेगळाच होणार आहे. कारण विलिसजवळ काहीही गमविण्यासारखे नव्हते. त्यामुळे विलिसने खेळाचा आनंद लुटला.
- या सामन्यात 25 वर्षाच्या मार्कसने फेडररविरोधात 24 विनर्स आणि 9 एस लगावले.
- सोबतच मार्कस दो वेळा फेडररची सर्विस ब्रेक करण्यापर्यंत पोहचला होता. त्यामुळेच विलिस इतका आनंदी होता की, फेडररविरोधात तो इतके काही करू शकला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फेडररसोबतच्या मॅचदरम्यान मार्कस आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे हावभाव....
बातम्या आणखी आहेत...