आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनीमध्ये तिसरा टी-२० सामना आज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम टी-२० क्रिकेट सामन्याला रविवारी भारतीय वेळेप्रमाणे दुपारी २ वाजता सुरुवात होईल. भारत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. भारताने पहिला सामना ३७ आणि दुसरा २७ धावांनी जिंकला. अखेरच्या सामन्यात अॅरोन फिंचच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व शेन वॉटसनकडे देण्यात आले आहे.
भारतीय संघ टी-२० सामन्यात शानदार प्रदर्शन करत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारांत ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरला. संघातील अनुभवी खेळाडू सुरेश रैना, युवराज सिंग, आशिष नेहराने पुनरागमन केले आहे. युवा खेळाडू हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले.