आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिस-यांदा चॅम्पियन, सेरेना फ्रेंच अाेपनची विजेती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने शनिवारी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात चेक गणराज्यच्या लुसिया सफाराेवाचा पराभव केला. अव्वल मानांकित सेरेनाने ६-३, ६-७, ६-२ अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने करिअरमध्ये २० वे ग्रँडस्लॅम अापल्या नावे केले तसेच तिस-यांदा फ्रेंच अाेपनची स्पर्धा जिंकली.

यासाठी अव्वल मानांकित सेरेनाला तीन सेटपर्यंत झंुज द्यावी लागली. तिला चेक गणराज्यच्या २८ वर्षीय सफाराेवाने चांगलचे झुंजवले. मात्र, अमेरिकेच्या ३३ वर्षीय सेरेनाने तिस-याअाणि निर्णायक सेटमध्ये बाजी मारून सामना अापल्या नावे केला. तिने दमदार सुरुवात करताना अवघ्या ३१ मिनिटांमध्ये पहिला सेट जिंकला हाेता. त्यानंतर सफाराेवाने दुसरा सेट जिंकून दमदार पुनरागमन केले हाेते. मात्र, तिला तिस-या सेटमध्ये ही लय कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे तिचा फायनलमध्ये पराभव झाला.

सफाराेवाचा दबदबा
चेक गणराज्यच्या लुसीया सफाराेवाने प्रथचम ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने एकही सेट न गमावता महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली हाेती. तिने गत विजेत्या शारापाेवाविरुद्ध विजयाची नाेंद केली. या सामन्यातही तिने सेट गमावला नाही. मात्र, तिला फायनलमध्ये सेट गमावून पराभव पत्करावा लागला.

याेकाे ‘विन’, मरे बाहेर
जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकने शनिवारी फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या अँडी मरेचा पराभव केला.
सर्बियाच्या याेकाेविकने
६-३, ६-३, ५-७, ५-७, ६-१ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने तिस-यांदा फ्रेंच अाेपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अाता पुरुष एकेरीचा अंतिम सामना जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि माजी अाॅस्ट्रेलियन चॅम्पियन स्टॅन वावरिंका यांच्यात रविवारी हाेणार अाहे. वावरिंकाने शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या त्साेंगाचा पराभव केला अाणि पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली.

अव्वल मानांकित नाेवाक याेकाेविकला विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. यासाठी त्याला पाच सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. यात त्याने बाजी मारून सामना अापल्या नावे केला. इंग्लंडच्या मरे अाणि सर्बियाच्या याेकाेविकने शुक्रवारी प्रत्येकी दाेन सेट जिंकले हाेते. त्यानंतर पाचव्या सेटमधील लढतीदरम्यान पावसाचे अागमन झाले हाेते. ही लढत अर्ध्यावर थांबवावी लागली. त्यानंतर शनिवारी पाचव्या अाणि निर्णायक सेटमधील झंुज पुन्हा रंगली. यात याेकाेविकने बाजी मारून सामना अापल्या नावे केला. या वेळी प्रचंड मेहनतीच्या बळावर मरेने दमदार पुनरागमन केले हाेते.

वावरिंकासमाेर आज नाेवाक याेकाेविक
पुरुष एकेरीच्या किताबासाठी स्विसचा स्टॅन वावरिंका व जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक यांच्यात फायनल रंगणार अाहे. माजी अाॅस्ट्रेलियन अाेपन चॅम्पियन वावरिंकाने उपांत्य सामन्यात त्साेंगाचा पराभव केला. यासह त्याने अंतिम फेरी गाठली. अाता त्याला याेकाेविकच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.