आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालू बाइक रेसमध्ये अचानक पेट्रोल संपले, पाहा मग काय केले या रायडरने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - सॅन मॅरिनो मोटो ग्रॅन्ड प्रिक्स बाइक रेसिंग स्पर्धेत एक गंमतीशीर क्षण पाहायला मिळाला. यामाहा रायडर जोहान जार्को चक्क रेसमध्ये बाइक हातात घेऊन पळत होता. त्याच्या सुपरबाइकचे पेट्रोल अचानक संपले होते, परिणामी बाइक बंद पडली. अशात जार्कोने बाइकवरून उतरून चक्क लोटत-लोटत फिनिशिंग लाइन पार केली. त्याला यासाठी एक पॉइंट सुद्धा देण्यात आला. 28 लॅप्स आणि 118.3 किमी लांब या रेसमध्ये स्पेनच्या मार्क मारक्वेजने बाजी मारली. 
 
 
बाइक लोटून आला 15 व्या नंबरवर
- फ्रान्सचा रायडर जार्को शेवटच्या लॅपमध्ये सातव्या नंबरवर होता. शेवटच्या लॅपमध्ये (फेरा) तो 11 व्या टर्नवर पोहोचलाच होता, की अचानक त्याच्या बाइकचे पेट्रोल संपले. यावर वेळीच 27 वर्षीय जार्को बाइकवरून खाली उतरला. आपली बाइक हातात धरली आणि ती लोटून पळताना त्याने शेवटचे लॅप पूर्ण केले. 
- बाइक लोटत असताना त्याच्या मागचे रायडर एका-पाठोपाठ एक करून पुढे निघून गेले. तरीही त्याने 160 किलोंच्या बाइकसह धावून लाइन क्रॉस केली. तो 15 व्या नंबर होता. तसेच त्याने एक अतिरिक्त पॉइंट देखील मिळवला होता. जागतिक क्रमवारीत तो 110 अंकांसह सहाव्या क्रमांकावर आहे. 

पुढील स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...