आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thought About Committing Suicide In Jail Says S Sreesanth

.. अन्‍यथा श्रीसंतने तिहार तुरूंगात आत्‍महत्‍या केली असती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तिहार कारागृहात असताना आपण आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. मात्र देवावर आणि कुटुंबावर विश्वास असल्‍यामुळे मी स्वत:वर नियंत्रण ठेवले. असे धक्‍कादायक मत एस. श्रीसंतने मांडले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घातलेली बंदी उठविण्यासाठी श्रीसंतने BCCI ला नुकतीच विनंती केली आहे. मागील आठवड्यात दिल्ली न्यायालयाने आयपीएल फिक्सिंग प्रकरणी त्‍याला निर्दोष मुक्त केले. BCCI चे सचिव अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन मी माझ्यावरील बंदी उठवण्‍यासाठी त्‍यांना विनंती करणार आहे. त्‍यांच्‍याकडून मला सकारात्‍मक प्रतिसादाची अपेक्षा असल्‍याचेही तो म्‍हणाला.