स्पोर्ट्स डेस्क- पहिल्यांदाच पाकिस्तानचे नाव एखाद्या चांगल्या कामासाठी पुढे आले आहे. तेथील तीन इंजिनिअर तरूणांनी अशी टेक्नोलॉजी शोधली आहे ज्याचा क्रिकेट खेळाला फायदा होणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये संशयित बॉलिंग अॅक्शन (बॉल चकिंग) वरून अनेक क्रिकेटर्सवर बंदी घातली आहे. मात्र, पाकिस्तानमधील या तीन इंजिनिअरनी गोलंदाजाची शैली वैध आहे की अवैध आहे ते अचूक जाणारे मशिन तयार केले आहे. काही गोलंदाज बॉल चकिंग करतात मात्र, अनेकांचे याच आरोपामुळे क्रिकेटमधी करिअर धोक्यात आले आहे. श्रीलंकेचा महान स्पिनर मुथय्या मुरलीधरन याच्यावरही काही काळ बंदी घातली गेली होती तर त्याचे संपूर्ण करिअरदरम्यान धोक्याची घंटा होती. थेट मोबाईलवर दिसेल हाताची मूव्हमेंट...
- संशयित अथवा फेकी बॉलिंग अॅक्शन (बॉल चकिंग)ला या तंत्रज्ञानामुळे ओळखणे सहज सोपे जाणार आहे.
- याच कारणामुळे अनेक सामन्यात याचा निकालावर परिणाम होतो.
- क्रिकफ्लेक्स नावाचे हे डिवाईस बॉलरच्या हातावर लावले जाईल.
- तसेच रियल टाईममध्ये बरोबर की चुकीची अॅक्शनची माहिती देईल.
- क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, या तीन इंजिनिअरनी ड्राय फिट मटेरियलची जेनेरिक स्लीव बनवली आहे.
- या स्लीवमध्ये शिक्क्याच्या आकाराचे डिवाईस फिट बसेल. यात बॉलिंग अॅक्शनची माहिती घेण्यासाठी खास सेन्सर लावले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसे काम करते हे क्रिकफ्लेक्स डिवाईस...