आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वेळचा विश्वविजेता जलतरणपटू मिक शार्कच्या तावडीतून बचावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग- तीन वेळचा विश्वविजेता जलतरणपटू मिक फॅनिंगने आभाळाएवढे धैर्य दाखवले. शार्क माशाशी दोन हात करून त्याने स्वत:चे प्राण वाचवले. ऑस्ट्रेलियन दिग्गज फॅनिंग समुद्रात सर्फिंग करत असताना शार्कने त्याच्यावर हल्ला केला. फॅनिंगच्या पायातून सर्फिंग प्लेट निसटून गळून पडली. त्यानंतर फॅनिंगने शार्कशी दोन हात करण्याचे ठरवले. शार्कवर त्याने ठोशांनी जोरदार प्रहार केले. त्यामुळे फॅनिंगची सुटका झाली. द.आफ्रिकेच्या जेफ्रिज किनाऱ्यावर एका स्पर्धेदरम्यान तो पोहत होता. टीव्हीवर लाइव्ह ही स्पर्धा सुरू होती. या घटनेचा व्हिडिओ वर्ल्ड सर्फ लीगच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...