आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Accused Of Affair With Rival's Wife, Janiye Abhi, Tiger Woods Sex Life

टायगर वुड्सचे प्रतिस्पर्धी गोल्फरच्या पत्नीसोबत संबंध, गर्लफ्रेंडने पकडले रंगेहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमांडा बॉएड आणि टायगर वुड्स. - Divya Marathi
अमांडा बॉएड आणि टायगर वुड्स.
न्यूयॉर्क - जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वुड्सवर प्रतिस्पर्धी गोल्फर जेसन डफनरची पत्नी अमांडा बॉएडसोबत संबंध ठेवण्याचा आरोप आहे. या अफेअरमुळे टायगर वुड्सचे गर्लफ्रेंड लिंडसे वॉन सोबत बिनसले आहे. त्यांच्यात दोन वर्षांपासून डेटिंग सुरु होती. वॉनने टायगरला रंगेहात पकडले होते. याची माध्यमात चर्चा सुरु झाल्यानंतर टायगरने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. टायगर वुड्स सिक्रेट सेक्स लाइफ आणि अनेक महिलांसोबतच्या संबंधामुळे वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेला आहे. 2009 मध्ये टायगरबद्दल सर्वात मोठा खुलासा झाला होता. त्याचे एक डझन महिलांसोबत संबंध असल्याचे तेव्हा उघड जाले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी (2010) पत्नी अॅलिन नॉर्डग्रेनसोबत त्याचा घटस्फोट झाला होता.
काय आहे नवा वाद
एन्क्वायररच्या ताज्या माहितीनूसार, लिंडसेसोबत अनेक वर्षांपासून डेटिंग सुरु असताना टायगरने अमांडासोबत संबंध ठेवले होते. याची सुरुवात फ्लर्टिंगपासून झाली होती मात्र नंतर दोघेही या नात्याबाद्दल गंभीर झाले होते. 27 वर्षांच्या अमांडा बॉएडने पती गोल्फर जेसन डफनरबरोबर मार्चमध्ये काडीमोड घेतला आहे. जेसनला जेव्हा कळालेकी अमांडा आणि टायगर यांच्यात काही सुरु आहे, तेव्हा तो अतिशय निराश झाला होता. अमांडा याआधीही इतर गोल्फरसोबत फ्लर्टिंगमुळे चर्चेत होती.
उत्कृष्ट गोल्फर अशी ख्याती असलेल्या टायगरने गेल्या काही काळात कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्याच्या खराब झालेल्या छबीमुळे त्याला मिळणार्‍या जाहिरातीही कमी झाल्या आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमांडा बॉएडची छायाचित्रे