आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन सुपर लीगसाठी खेळाडूंवर अाज लागणार बाेली !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या ३ अाॅक्टाेबरपासून दुस-या सत्राच्या इंडियन सुपर लीग (अायएसएल) फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या सत्रासाठी शुक्रवारी खेळाडूंवर बाेली लागणार अाहे. त्यामुळे युवा खेळाडूंमध्ये माेठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले अाहे. ही लीग ३ अाॅक्टाेबर ते ६ डिसेंबरदरम्यान रंगणार अाहे. अाठ फ्रँचायझीचे संघ या लीगमध्ये नशीब अाजमावत अाहे.

त्या दहा खेळाडूंवर असेल नजर
पहिल्या सत्रात भारताच्या सुनील छेत्रीसह १० जणांना सहभागी हाेता अाले नाही. मात्र, अाता हे खेळाडू खेळण्यास उत्सुक अाहेत. त्यासाठी शुक्रवारी या खेळाडूंवरही बाेली लागणार अाहे. यासाठी त्यांची मूळ किंमतही निश्चित करण्यात अाली. यामध्ये करणजित सिंग (६० लाख), अनास इ, अराजा इजुमी, राॅबिन सिंग (४० लाख), थाेई सिंग (३९ लाख), युजीनीसन (२७-५० लाख), जॅकीचंद, सेत्यासेन (२० लाख), रिनाे अंटाे (१७-५० लाख) या सर्व अव्वल चा समावेश अाहे.

भारताचे ११३ खेळाडू : भारताच्या एकूण अव्वल ११३ खेळाडूंवर शुक्रवारी बाेली लागणार अाहेत. यात सुनील छेत्रीसह अव्वल खेळाडूंचा समावेश अाहे. तसेच यासाठी वेगळा ड्राॅफ्ट करण्यात अाला. भारताच्या खेळाडूंमध्ये एकूण १५ गाेलरक्षक, ३५ डिफेंडर, ५२ मिडफिल्डर अाणि ११ स्ट्रायकरचा यासाठी समावेश करण्यात अालेला अाहे.

सुनील छेत्रीला ८० लाखांची बेसप्राइस
भारतीय संघाचा स्टार स्ट्रायकर सुनील छेत्रीला सर्वाधिक भाव मिळण्याची शक्यता अाहे. यासाठी त्याला या लिलावादरम्यान ८० लाखांची सर्वाधिक पायाभूत किंमत (बेसप्राइस) निश्चित करण्यात अाली अाहे. भारतीय संघाकडून सर्वाधिक गाेल करण्याचा विक्रम ३० वर्षीय छेत्रीच्या नावे अाहे.
छायाचित्र: सुनील छेत्री