आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेेत उद‌्घाटन सोहळ्यात काटकसरीचे रंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकचे दिमाखदार उद्घाटन आणि समारोप सोहळ्याचे आयोजन करण्याच्या रेक्यू फर्नांडो मेमटेल्लेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांपुढे रिओ ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्याचे अवघड आव्हान आहे. आर्थिक अडचण ही पहिली समस्या आहे. असे कळते की लंडन ऑलिम्पिक सोहळ्यासाठीच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत फक्त १० टक्के रकमेचे अंदाजपत्रकात ठेवण्यात आले आहे. यावरून यजमानांच्या तिजोरीतील खडखडाटाचा अंदाज येतो. तरीही फर्नांडोने ब्राझीलच्या तुटपुंज्या बजेटमध्येही आपल्या कर्तृत्वाचे दर्शन घडवले आहे. रिओ ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा काटकसरीचा कार्यक्रम असेल. यात फार उधळपट्टी, फाजील खर्च नसेल.

गेल्या मे महिन्यापासून सुमारे ६ हजार कार्यकर्ते या उद्घाटन सोहळ्याचा सराव करीत आहेत. या उद्घाटनात रिओच्या प्रसिद्ध कॉर्निव्हलचा टच असणार आहे. कलेचे अाविष्कार या सोहळ्यात बघायला मिळतील. त्यात भावनात्मक आवाहन आणि ब्राझीलच्या संस्कृतीचे अंतरंग असणारे संगीत असेल. सरकता रंगमंच आणि त्यासारख्या अनेक हायटेक कल्पना बस्त्यात गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत. डायरेक्टर डॅनियल थॉमस यांच्या मते, ब्राझीलच्या सर्वोत्तम संगीताचा नजराणाच सर्वांपुढे पेश होणार आहे. अनिल, काएतानो वेलोस्को, बर्टे गिल यांचा सहभाग यापूर्वीच घोषित करण्यात आला होता. ब्राझीलची मॉडेल गिझल बंडचेन ही सोहळ्याचे आकर्षण असेल.
येथे राहील आपली नजर
> ११९ खेळाडू, १५ क्रीडा प्रकारांत सहभाग. भारताचे आजपर्यंतचे सर्वात मोठे पथक. लंडन ऑलिम्पिकमध्ये (२०१२) ८३ खेळाडू.
> रिओ जाणाऱ्या भारतीय पथकात ५६ महिला खेळाडू. ५ पदकांच्या दावेदार.
> महत्त्वाचे दिवस : ६, ७, ८, १२, १३, १५, १७, १८, १९, २१ ऑगस्ट.
> मागच्या वेळी ६ पदके जिंकली होती. या वेळी १२ पदकांची अपेक्षा.
> महत्त्वाचे खेळ : नेमबाजी, धनुर्विद्या, कुस्ती, मुष्टियुद्ध, बॅडमिंटन, टेनिस.
> १९ ऑगस्टला कळणार नरसिंग यादवचे जाणे सार्थक ठरले की नाही?
> सानिया- सायनाला काय मिळाले?
... आणि येथे जगाची
> १३, १४ ऑगस्ट : १०० मीटर धावणे.
> बोल्ट हरणार की नवीन विक्रम नोंदवणार?
> ९-१० ऑगस्ट : जलतरण. संन्यासाहून परतलेला फेल्प्स पुन्हा सुवर्ण जिंकणार की खाली हात राहणार?
अमेरिका - चीनमध्ये सर्वात पुढे राहण्याची स्पर्धा
लंडन ऑलिम्पिक (२०१२) मध्ये ४६ सुवर्णपदकांसह १०३ पदके जिंकून अमेरिका पहिल्या क्रमांकावर होती. ३८ पदकांसह चीन दुसऱ्या क्रमांकावर होता.
> बीजिंग ऑलिम्पिकमध्ये (२००८) ५१ सुवर्ण व १०० पदके जिंकून चीन पहिल्या क्रमांकावर होता. ३६ सुवर्ण व ११० पदके जिंकून अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर होती.
अभिनव बिंद्रा भारताचा ध्वजधर : उद‌्घाटन समारंभात नेशन्स ऑफ परेडमध्ये भारतीय पथक ९५ व्या क्रमांकावर येईल. भारतीय पथकाचे नेतृत्व बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा करेल.
> उद‌्घाटन : ६ ऑगस्ट, शुक्रवारी सकाळी ४.३० वाजता. (भारतीय वेळ).
> सामन्यांचे थेट प्रक्षेपण { स्टार स्पोर्ट्स आणि दूरदर्शनवर
> २.१ कोटी डॉलर खर्च होईल उद‌्घाटन समारंभावर. चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये ४.२ कोटी डॉलर खर्च झाले होते.
> या वेळी उद‌्घाटन समारंभाचा संदेश ‘निरंतरता, ब्राझिली लोकांचे हास्य आणि भविष्याची आशा’ असेल.
बातम्या आणखी आहेत...