आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टुक-टुक पोलो’अॉटोत बसून पोलोचा खेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॉल (श्रीलंका) - आतापर्यंत आपण हॉर्स पोलो, वॉटर पोलो, स्नो हॉर्स पोलो, सायकल पोलो किंवा एलिफंट पोलोबाबत एेकले होते. आता यात एक नवे नाव जुळले आहे. हे नाव आहे "टुक-टुक पोलो', म्हणजे अॉटोत बसून खेळले जाणारे पोलो. ऐकण्यास थोडे अजब वाटते. मात्र, हा खेळ श्रीलंकेत सुप्रसिद्ध आहे. आता तर याचे स्पर्धा आयोजनही होऊ लागले आहे. ही स्पर्धा पयर्टकांतही लोकप्रिय ठरत आहे.

पहिली "टुक-टुक पोलो' स्पर्धा मार्च २०१३ मध्ये गॉल डच फोर्टवर झाली. या खेळात एका संघात ३ खेळाडू असतात. याला ड्रायव्हर कंट्रोल करतो आणि मागच्या सीटवर खेळाडू बसलेला असतो. यात पुरुष आणि महिला खेळाडू दोन्ही असतात. पुरुष खेळाडू उजव्या हाताने पोलो स्टिक पकडतो, तर महिला दोन्ही हाताचा उपयोग करू शकते. यात एक पंच खेळावर लक्ष ठेवतो.