आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे फुटबॉलपटूचा ब्रेन डॅमेज; १० वर्षांनी ५९ कोटींचा मोबदला !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ऑगस्ट २००६ मध्ये १७ वर्षीय रदवान हामेदची इंग्लिश प्रीमियर लीगचे (ईपीएल) क्लब टोटेनहॅम हॉटस्पूरच्या ज्युनियर संघात निवड झाली. त्याची वैद्यकीय चाचणी झाली. चाचणीत हामेदला हृदयाचा आजार असल्याचे समजले. फुटबॉल खेळणे त्याच्यासाठी अयोग्य होते. यानंतरही क्लबच्या मेडिकल टीमने त्याला खेळण्याची परवानगी दिली. काही दिवसांनंतर हामेद बेल्जियममध्ये आपला पहिला सामना खेळण्यास उतरला. मैदानात उतरताच काही मिनिटांत त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे प्राण तर वाचले, मात्र ब्रेन डॅमेज झाला. यानंतर रदवानचे वडील रेमंड हामेद यंानी क्लबवर खटला दाखल केला. १० वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर त्यांना अखेर न्याय मिळाला. न्यायालयाने क्लबकडून रदवानला ७ मिलियन पाउंड (जवळपास ५९ कोटी रुपये) मोबदला देण्याचा निर्णय िदला.

न्यायालयाने म्हटले की, क्लबने आपली जबाबदारी पाळली नाही. त्याच्या ५९ कोटींपैकी ७० टक्के क्लब तर ३० टक्के त्या डॉक्टरकडून वसूल केले जातील, ज्याने रदवानची वैद्यकीय चाचणी केली होती. रदवानची वैद्यकीय चाचणी करणाऱ्या कार्डिओलॉजिस्ट टीममध्ये डॉक्टर पीटर मिल्स, डॉक्टर चार्लोटे कोवी आणि डॉक्टर मार्क कर्टिन यांचा समावेश होता. यातील डॉक्टर कोवी इंग्लंडमध्ये फुटबॉलची मुख्य संघटना एफएचे मेडिकल डायरेक्टर बनले. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याच्या एफएच्या निर्णयावरही टीका झाली. या निर्णयानंतर आता कोवींची या पदावरून हकालपट्टी होऊ शकते.

न्यायाधीशांनी निकाल देताना सांगितले की, मोबदल्याची रक्कम इतकी असली पाहिजे की त्यामुळे खेळाडूची नुकसान भरपाई आणि भविष्यातील गरजाही पूर्ण झाल्या पाहिजेत. क्लब नुकसान भरपाई देण्यास तयार आहे. क्लबने म्हटले की, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका युवा खेळाडूचे इतके हाल झाले, ही अत्यंत खेदजनक घटना आहे. या निर्णयानंतर रदवानचा उपचार योग्य पद्धतीने होईल आणि तो चांगले जीवन जगू शकेल, अशी आशा आहे. १० वर्षांत त्याची भरपूर मदत केली आहे. आता आम्ही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे क्लबने म्हटले.
बातम्या आणखी आहेत...