आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात कठीण माउंटेन रेस; अंतर-315 किमी, वेळ-5 दिवस, 24 देशांचे 223 रनर, अाज निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्डिफ (वेल्स)- ड्रॅगन बॅक रेस म्हणजे जगातील सर्वात कठीण शर्यत मानली जाते. वेल्स अाल्प्सच्या डाेंगरावरच्या या ३१५ किमी अंतराच्या रेसमध्ये यंदा २४ देशांचे २२३ रनर सहभागी हाेत अाहेत. ही रेस दाेन वर्षांत हाेते. मेच्या शेवटच्या अाठवड्यात अायाेजित करण्यात येणारी ही रेस साेमवारपासून सुरू हाेईल. शुक्रवारी समाराेप हाेईल. रेस पूर्ण करण्यासाठी एक रनर हा १५,५०० मीटरचे चढ-उतर करणार अाहे. महिला व पुरुष गटात स्वतंत्र विजेते असतील.

- रेस सकाळी सुरू हाेते व संध्याकाळी बेस कॅम्पला परतावे लागते. रनरवर जीपीएसने लक्ष ठेवले जाते. नियमाचे उल्लघंन केल्याने कडक कारवाई हाेते.
- १९९२ पासून ही रेस सरू. गत वर्षी १४० सहभागी झाले. ६५ जणांना ही रेस पूर्ण करता अाली.

प्रत्येक रेसरची वेगळी कहाणी
या रेसमध्ये प्रत्येक जण हा वेगवेगळ्या कारणांमुळे सहभागी हाेताे. यंदा धावत असलेल्या एका रनरच्या पत्नीला कॅन्सर अाहे. ताे उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी या रेसमध्ये धावत अाहे. दुसरा एक रनर पत्नी साेडून गेल्यामुळे यात सहभागी झाला. एक जण माेटिव्हेशनसाठी धावणार अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...