आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 स्टेज अाणि 3615 किमीच्या रेसनंतर अाज ठरणार 100 व्या टूर अाॅफ इटलीचा विजेता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलान - टू दि फ्रान्स अाणि वुएल्टा ए स्पेनासह जगातील तीन सर्वात कठीण अाणि प्रतिष्ठित  सायकलिंग रेसपैकी एक गायराे डि इटालिया (टूर अाॅफ इटली) स्पर्धेची २१ वी अाणि फायनल स्टेज रविवारी पूर्ण हाेणार अाहे. काेलंबियाचा नाइराे क्विंटना अाता १९ स्टेजनंतर अव्वल स्थानावर अाहे. त्याच्याकडे अवघ्या ३८ सेकंदांची अाघाडी अाहे अाणि शेवटच्या दाेन स्टेजमध्ये कलाटणी बसू शकते. या रेसमध्ये नंबर वन राहणाऱ्याला पिंक जर्सी दिली जाते. टू द फ्रान्समध्ये पिवळी जर्सी दिली जाते.

गाइराे डि इटािलया (टूर अाॅफ इटली) रेसच्या १९ व्या स्टेजमध्ये सायकलिस्ट सहभागी हाेतात. यंदा जगातील १९७ सायकलिस्ट सहभागी झाले.

६९ किमी अधिक अंतर टूर द फ्रान्सच्या तुलनेमध्ये या रेसमध्ये सायकलिस्टला पार करावे लागते.
२१ स्टेज असतात एकूण. टूर द फ्रान्समध्ये एवढेच स्टेज असतात. स्पॅनिश टूरमध्ये २१ असतात.
१९०९ मध्ये पहिल्यांदा टूरचे अायाेजन.पहिल्या व दुसऱ्या महायुद्धादरम्यान अायाेजन नाही.
 
बातम्या आणखी आहेत...