आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉय कंपनीने बनवली अमेरिकन फुटबॉलपटू एबी वेमबॅकसारखी दिसणारी बार्बी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - आपण बार्बी डॉलला विविध रूपात पाहिले आहे. मात्र, आता बार्बी एका फुटबॉलपटूच्या रूपातही दिसणार आहे. या टॉयला बनवणारी कंपनी माटेलने माजी अमेरिकन लेस्बियन फुटबॉलपटू एबी वेमबॅकसारखी दिसणारी बार्बी डॉल बनवली आहे. "एबी बार्बी' नावाची ही डॉल अमेरिकन फुटबॉल टीमच्या युनिफॉर्ममध्ये असून तिने २० नंबरची जर्सी परिधान केली आहे. हा एबीच्या जर्सीचा नंबर होता. वेमबॅकने सोशल मीडियावर या बार्बीचा फोटो शेअर केला. हा माझा खूप मोठा सन्मान आहे, असे मला वाटते, असे तिने म्हटले.
वेमबॅकने िट्वटवर लिहिले की, "मी हा सन्मान मिळवून खूप आनंदी आहे. हे खूप मोठे यश आहे. स्वत:ची जर्सी घातलेली बार्बी.. यापेक्षा चांगले काय घडू शकते? इतर मुलींप्रमाणे मलासुद्धा लहानपणांपासून बार्बी डॉल आवडते. ही डॉल युवा मुलींना प्रोत्साहित करेल,' असेही तिने म्हटले.
वेमबॅकने दोन दिवसांपूर्वीच आपली आई जुडीला तिच्यासारख्या दिसणाऱ्या डॉलबाबत सांगितले होते. हे आश्चर्यजनक आहे. माझ्या मुलीसाठी हे खूप मोठे यश आहे, असे तिची आई म्हणाली. "एबी बार्बी' ही बार्बीच्या "शेरो'चा कलेक्शनचा भाग आहे. बार्बीने जशी सर्व सीमा पार करून िलंगभेद संपवून सर्वत्र आपली ओळख निर्माण केली तसेच या कलेक्शनमध्ये अशा प्रकारच्या धाडसी महिलांची डॉल बनवली जाते. वेमबॅक दोन वेळा ऑलिम्पिक आणि एक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या अमेरिकन टीमची सदस्या होती. तिला सहा वेळेस "अमेरिकन फुटबॉलर ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात आले आहे. तिने १५ वर्षे अमेरिकेसाठी फुटबॉल खेळल्यानंतर या वर्षी निवृत्ती घेतली. ती आपल्या टीमची सहकारी सारा हफमॅनसोबत लग्न केल्यानेसुद्धा चर्चेत आली होती. दोघींनी २०१३ मध्ये हवाई येथे लग्न केले होते.