आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सजेंडर मल्लाला मुलींच्या स्पर्धेत सुवर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - महिलेचा पुरुष बनलेला १७ वर्षीय ट्रान्सजेंडर मल्ल मॅक बेग्सने ४९ किलो वजन गटात टेक्सास मुलींच्या राज्य चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवून अनोखे यश मिळवले आहे. आयोजकांनी सुरुवातीला मॅकला मुलांच्या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिला. यानंतर त्याने मुलींच्या राज्य चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेऊन विजय मिळवला. मात्र, मॅकचे कुटुंब आणि त्याच्या विरोधकांनासुद्धा त्याने ही कुस्ती मुलांच्या गटात खेळायला हवी, असे वाटत होते. मात्र, राज्य क्रीडा नियमानुसार ती ज्या जेंडरमध्ये जन्मली त्याच गटात खेळू शकते. यामुळे मॅकला नाइलाजाने महिलांत कुस्ती खेळावी लागली.   
 
काही विरोधी मल्लांनी मॅकवर आक्षेपही घेतला. मुलींत कुस्ती खेळताना त्याला अधिक शक्तिशाली असल्याचा फायदा मिळाला. कारण, मुलगा बनण्यासाठी त्याने खूप दिवस टेस्टोस्टेरोन हे औषध घेतले, असा विरोधी मल्लांचा आक्षेप होता. टेक्सासमध्ये स्कूल स्पोर्ट््सचे संचालन करणाऱ्या युनिव्हर्सिटी इंटरस्काेलिस्टिक लीगने म्हटले की, ‘काही खेळाडूंना त्यांचे डॉक्टर बंदी असलेले औषध सेवन करण्याची परवानगी देत असतील तर मग ते त्या औषधांचा उपयाेग करू शकतात. 

यामुळे डोपिंग किंवा इतर कोणताही नियम भंग होत नाही.’ अमेरिकेत नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासनाने शाळेत समलैंगिक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सोयीने शौचालयाच्या उपयोगाचा नियम रद्दबातल ठरवला असताना मॅकच्या विजयाचे हे वृत्त समोर आले. ट्रम्प शासनाच्या या निर्णयानंतर समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर समूहात राष्ट्रपतींविरुद्ध जबरदस्त राग निर्माण झाला आहे. डलास येथे ट्रिनिटी हायस्कूलमध्ये मॅक विद्यार्थी आहे. याआधी त्याचा रेकॉर्ड ५२-० असा होता. तो आधीपासून किताबाचा प्रबळ दावेदार होता. मॅकने चेल्सी सांजेजला  १२-२ ने पराभूत करून चॅम्पियनशिप जिंकली. एक आठवडा आधी मॅकने एका महिला मल्लाविरुद्ध विभागीय स्पर्धा जिंकली होती.
बातम्या आणखी आहेत...