आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन संघटनांच्या वादामुळे स्पर्धांवर बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दोनसंघटनांमधील वादामुळे सायकलिंग, तायक्वांदो, चॉयक्वांदो आणि किकबॉक्सिंग या खेळाच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील शालेय स्पर्धा आयोजनावर क्रीडा युवक सेवा संचालनालयाने स्थगिती दिली आहे. यासंदर्भातील आदेश बुधवारी विभागीय क्रीडा उपसंचालक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.

संघटनांच्या वादामुळे स्पर्धांचे आयोजन विस्कळीत होऊन त्याचा परिणाम खेळाडूंवर झाला. याकरिता पुढील आदेशापर्यंत चारही खेळांच्या स्पर्धांना स्थगिती दिल्याचे आदेश राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक एन. बी. मोटे यांनी काढला.

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. या स्पर्धांचे आयोजन करताना सबंधित खेळांच्या अधिकृत संघटनेकडून तांत्रिक सहकार्य घेऊन त्या पार पाडल्या जातात. यंदाही शालेय वर्षात तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु सायकलिंग, तायक्वांदो, चॉयक्वांदो आणि किकबॉक्सिंग या खेळाच्या राज्यस्तरावर २-२ समांतर संघटना कार्यरत असून यांच्यात टोकाचे वाद आहेत. दोन्ही संघटनांकडून आपणच अधिकृत असून तांत्रिक सहकार्य आपल्याच संघटनेकडून घेण्याबाबत विनंतीपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे वाद असलेल्या संघटनांपैकी अधिकृत संघटना कोणती आहे, याबाबत निर्णय घेण्यास काही कालावधी लागणार आहे. स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आयोजनात अडचणी निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

शासनासमोर पुरावे मांडू; कोर्टात जाऊ
वादबाजूला ठेवून खेळाडूंच्या हिताचा प्रथम निर्णय घेण्यात येईल. शासनासमोर पुरावे मांडू, कोर्टातही जाऊ. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चाललो आहोत, पुढेही चालणार. -नीरज बोरसे, तायव्वांदो संघटना
योग्य निर्णय
चारहीखेळांच्या प्रत्येकी राज्य आणि काही ठिकाणी जिल्हा संघटना कार्यरत अाहेत. त्यांच्यातील वादामुळे या खेळांच्या स्पर्धा आयोजनास अडचणी निर्माण होत होत्या. वादात खेळाडूंवर अन्याय होत असल्याने त्यांच्या स्पर्धेवर स्थगिती दिली. हा निर्णय खेळाच्या हिताचा आहे. ऊर्मिलामोराळे, जिल्हा क्रीडाधिकारी
वादविवाद