आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोवावर दोन वर्षांची बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोवा ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने बुधवारी तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. शारापोवाने मेल्डोनियम नावाचे प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याने ती दोषी आढळली. पाच वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन शारापोवाला यापूर्वीच मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने निलंबित केले होते. आता या निर्णयाविरुद्ध ती आंतरराष्ट्रीय क्रीडा पंचायतमध्ये दाद मागू शकते.
तिने स्वत: लाॅस एंजलिसमध्ये पत्रकार परिषदेत आपण जानेवारीत डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याची घोषणा केली हाेती. आंतरराष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने एक जानेवारीपासून मेल्डोनियम औषध वापरावर बंदी घातली असल्याची माहिती नसल्याचे तिने म्हटले होते. तिच्या वकिलाने म्हटले की, शारापोवाने जानेवारीनंतर या औषधाचे सेवन केले होते.
शारापोवाने जाणीवपूर्वक हे कृत्य केले नाही, मात्र डोपिंग प्रकरणात ती एकटीच जबाबदार आहे. ही तिची सर्वात मोठी चूक ठरली. ऑस्ट्रेलियन ओपननंतर फेब्रुवारीत मॉस्को स्पर्धेदरम्यान केलेल्या चाचणीतदेखील शारापोवा डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याचे आयटीएफने म्हटले. आयटीएफच्या तीनसदस्यीय समितीने तिच्यावर दोन वर्षे बंदीचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...