आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाशिया हाॅकी चषकासाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व उदिताकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | येत्या शुक्रवारपासून अाशिया चषक हाॅकी स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेसाठी युवा खेळाडू उदिताकडे भारताच्या महिला संघाचे नेतृत्व साेपवण्यात अाली. भारताचा १८ वर्षांखालील महिला हाॅकी संघ अाशिया चषकात खेळणार अाहे. यासाठी हाॅकी इंडियाच्या वतीने मंगळवारी युवा टीमची घाेषणा करण्यात अाली. १४ वर्षीय सलिमा टेटेची संघाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागली. ही स्पर्धा १६ ते २२ डिसेंबरदरम्यान, थायलंडच्या बँकाॅक येथे अायाेजित करण्यात अाली.

‘अाशिया चषकात नेतृत्व करण्याची मिळालेली संधी ही माझ्यासाठी अभिमानाची बाब अाहे. याच संधीचे चीज करण्याचा माझा प्रयत्न असेल,’ अशी प्रतिक्रिया युवा कर्णधार उदिताने दिली.
बातम्या आणखी आहेत...