आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6000 फूट उंच पर्वतावर धावण्याची 'रेस', 3524 किमी पळण्याचा केला विश्वविक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचा अल्टरामॅरेथॉनर कार्ल मेल्टजर हा सलग 45 दिवस धावत राहिला. त्याने दिवसाकाठी 15 तास 77 किमीचे अंतर गाठले. तो 6000 फूट उंचीच्या पर्वतावर धावला. - Divya Marathi
अमेरिकेचा अल्टरामॅरेथॉनर कार्ल मेल्टजर हा सलग 45 दिवस धावत राहिला. त्याने दिवसाकाठी 15 तास 77 किमीचे अंतर गाठले. तो 6000 फूट उंचीच्या पर्वतावर धावला.
अटलांटा - अमेरिकेचा अल्टरामॅरेथॉनर कार्ल मेल्टजर हा सलग 45 दिवस धावत राहिला. त्याने दिवसाकाठी 15 तास 77 किमीचे अंतर गाठले. तो 6000 फूट उंचीच्या पर्वतावर धावला. दरम्यान, त्याने नदी आणि अनेक पूलही पार केले. दिवस-रात्र तो धावतच राहिला. उन्हातान्हातही त्याने आपला हा छंद अविरतपणे जोपासला. डोंगरावर त्याने 5 लाख फूट क्लाइंबिंगदेखील केली. नव्या विश्वविक्रमासह रेस पूर्ण...
- गत रविवारी सकाळी 3.38 वाजता जॉर्जियाच्या स्प्रिंगर माउंटेनवर थांबल्यानंतर त्याने 3524 किमीची अल्ट्रामॅरेथॉन अपालाचियन ट्रायल पूर्ण केली.
- तीदेखील नव्या विश्वविक्रमासह. त्याने ही रेस 45 दिवस 22 तास 38 मिनिटांमध्ये पूर्ण केली.
- यादरम्यान त्याने आपला सहकारी आणि ट्रेनिंग पार्टनर स्कॉट ज्युरेकचा (46 दिवस, 8 तास 7 मिनिटे) विक्रम मोडीत काढला.
- या रेसदरम्यान कार्लने 345122 कॅलरी बर्न केली. अमेरिकेच्या 12 राज्यांचा परिसर त्याने पालथा घातला.
- यासाठी त्याला 20 बुटांचे जोड लागले. म्हणजेच त्याला दर दोन दिवसांसाठी एक बुटाचा जोड वापरावा लागला.
- त्याने एकूण 678 तास दौड लावली. अपालाचियन ट्रायल रेसमध्ये 11 हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.
- मात्र, यामध्ये कार्ल हा सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने तिसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेऊन फिनिश लाइन पार केली.
- ‘हा विश्वविक्रम नोंदवण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. यासाठी मी दररोज पहाटे 4 वाजता उठून 50 मैलांपर्यंत धावत होतो.
- सुरुवातीला मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, काही दिवसांमध्ये मी या अडचणींवर मात केली. त्याचेच फळ मला मिळाले,’ अशी प्रतिक्रिया कार्लने दिली.
सर्वात कठीण हार्डरॉक रेस जिंकणारा एकमेव धावपटू-

- ‘स्पीडगोट कार्ल’ नावाने प्रसिद्ध कार्लने आपल्या करिअरमध्ये 89 अल्ट्रामॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
- त्याने 38 पेक्षा अधिक 100 मैलांच्या रेस आपल्या नावे केल्या आहेत.
- याशिवाय कार्ल हा सर्वात कठीण हार्डरॉक 100 मैल इंड्युरन्स रेस पाच वेळा जिंकणारा एकमेव रनर आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अमेरिकन अल्टरामॅरेथॉनर कार्ल मेल्टजर कसल्या कसल्या भागातून पळत होता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...