आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय योग पद्धतीचा युनेस्कोने केला स्वीकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - युनेस्कोने पारंपरिक भारतीय योग पद्धतीचा स्वीकार केला असून संरक्षण व संवर्धन यादीत सांस्कृतिक वारसा म्हणून वरचे स्थान दिले आहे. ईथिओपिया या देशातील अदिस अबाबा शहरात झालेल्या युनेस्कोच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला.

नुकतेच २८ नोव्हे. ते २ डिसेंबर या कालावधीत युनेस्कोच्या आमसभेचे चर्चासत्र चालले. विविध देशांतील पारंपरिक नृत्य, हस्तकला, चालीरीती, पद्धती, खेळ व क्रीडा प्रकारांचे जतन करून ठेवण्याच्या उद्देशाने युनेस्को या संघटनेची आंतरराष्ट्रीय सरकारांची समिती आहे. या समितीद्वारे विविध राष्ट्रांमधील पारंपरिक, सांस्कृतिक, वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांच्या जपणुकीसाठी प्रस्ताव दरवर्षी आमंत्रित केले जातात.

युनेस्कोच्या महासभेत एकूण ५० पेक्षा जास्त प्रस्ताव आले होते. त्यात भारतीय योग पद्धतीचा प्रस्ताव होता तो सर्वानुमते सर्व मापदंडांची पूर्तता करून स्वीकृत करण्यात आल्याची माहिती एचव्हीपीएमचे प्रतिनिधी डाॅ. सुरेश देशपांडे यांनी दिली. या सभेला भारताच्या विविध प्रांतातील प्रतिनिधींचे मंडळ उपस्थित होते.
एनजीओने दिली मान्यता
अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला (एचव्हीपीएम) युनेस्कोने गैरसरकारी संस्था (एनजीओ) म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या आमसभेला मंडळाचे प्रतिनिधी म्हणून कोशाध्यक्ष डाॅ. सुरेश देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मल्लखांबसारख्या पारंपरिक व्यायाम प्रकाराचा अंतर्भाव युनेस्कोच्या अधिकृत यादीत व्हावा यासाठी एचव्हीपीएमचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही डाॅ. देशपांडे यांनी दिली आहे.
मुस्लिम राष्ट्रांनीही दिली मान्यता
युनेस्कोनेही योगाला सांस्कृतिक वारसा यादीत स्थान दिल्यामुळे निश्चितपणे जागतिक स्तरावर आणखी झपाट्याने योगाचा झपाट्याने प्रचार व प्रसार होणार आहे. विशेष बाब अशी की, युनेस्कोच्या महासभेत मुस्लिम राष्ट्रांनीही योगाला मान्यता दिल्याचे एचव्हीपीएमच्या प्रतिनिधींनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...