आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्री किकवर मेसीचा गोल; अर्जेंटिना फायनलमध्ये !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन (टेक्सास) - सुपरस्टार लियोनेल मेसीचा विक्रमी गोल आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू गोंजालो हिग्वेनच्या दोन शानदार गोलच्या बळावर गतवेळचा उपविजेता अर्जेंटिनाने यजमान अमेरिकेला सेमीफायनलमध्ये ४-० ने हरवले. या विजयासह अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता रविवारी अर्जेंटिना न्यू जर्सीच्या ईस्ट रुदरफोर्ड येथे होणाऱ्या फायनलमध्ये खेळेल. फायनलमधील दुसरी टीम चिली-काेलंबिया यांच्या सामन्यातून ठरेल.

या सामन्यात अर्जेंटिनाचे नेतृत्व करत असलेला स्टार फॉरवर्ड मेसीने सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर शानदार गोल केला. यासह तो आपल्या देशाकडून सर्वाधिक ५५ गोल करणारा खेळाडू बनला. पाच वेळेसचा वर्ल्ड फुटबॉलर ऑफ द इयरचा मानकरी ठरलेल्या मेसीने एनआरजी स्टेडियमवर ७०८५८ प्रेक्षकांच्या उपस्थितीने हा प्रेक्षणीय गोल केला. सेमीफायनल सामन्यात त्याने आपला ५५ वा आंतरराष्ट्रीय गोल करून हा विक्रम रचला. या गोलसह मेसीने गॅब्रियल बतिस्तुताचा विक्रमही मोडला. बतिस्तुताने ७८ सामन्यांत ५४ गोल केले होते. स्पर्धेत आता मेसीचे एकूण ५ गोल झाले आहेत. सुरुवातीपासून अर्जेंटिनाने अमेरिकेवर दबाव ठेवण्यात यश मिळवले. पहिल्या हाफच्या तिसऱ्या मिनिटालाच अर्जेंटिनाचा फॉरवर्ड लावेजीने हेडरने पहिला गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. अमेरिका सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न करीत होती, इतक्यात ३२ व्या मिनिटाला मेसीने दुसरा गोल केला. हाफटाइमपर्यंत अर्जेंटिनाची टीम २-० ने पुढे होती.

रोमांचक ठरलेल्या या सामन्यात यजमान संघ दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन करेल, असे अमेरिकेच्या चाहत्यांना वाटत होते. मात्र, असे घडले नाही. अमेरिकन संघाला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये ५० व्या मिनिटाला गोंजोला हिग्वेनने एक गोल करून अर्जेंटिनाचा स्कोअर ३-० असा केला. सामन्याच्या ८६ व्या मिनिटाला हिग्वेनने आपला दुसरा आणि सामन्यातील चौथा गोल करून स्कोअर ४-० असा केला. या विजयासह अर्जेंटिनाने अमेरिकेचे सामन्यात पुनरागमनाचे मार्ग बंद केले.
युरो कप : क्रोएशियाची स्पेनवर मात
इवान पेरिसिचने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे क्रोएशियाने युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात स्पेनला २-१ ने हरवले. या पराभवामुळे स्पेनचा स्पर्धेतील पुढचा मार्ग कठीण झाला आहे. २००४ नंतर १२ वर्षांत युरो कपमध्ये स्पेनचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. या पराभवामुळे स्पेन ड गटात दुसऱ्या स्थानी घसरला आहे. स्पेनचा फॉरवर्ड एल्वरो मोर्राटाने सातव्या मिनिटाला गोल करून संघाचे खात उघडले. क्रोएशियाकडून सामन्याच्या ४५ मिनिटांनी फॉरवर्ड निकोला कॅलनिकने गोल करून स्कोअर १-१ असा केला. यानंतर इवान पॅरिसिचने सामन्याच्या निर्धारित वेळेच्या तीन मिनिटे आधी ८७ व्या मिनिटाला गोल केला.
बातम्या आणखी आहेत...