Home | Sports | Other Sports | UPDATES OF UNDER 17 FOOTBALL WORLD CUP

UNDER 17 FOOTBALL WORLD CUP: इंग्लंडचा मेक्सिकाेला धक्का; भारताला अाज शेवटची संधी

वृत्तसंस्था | Update - Oct 12, 2017, 06:33 AM IST

युवा खेळाडू जॅक्सनच्या एेतिहासिक गाेलने अात्मविश्वास द्विगुणित झालेला यजमान भारतीय युवा संघ अाता फिफाच्या १७ वर्षांखालील

 • UPDATES OF UNDER 17 FOOTBALL WORLD CUP
  काेलकाता - युवा खेळाडू जॅक्सनच्या एेतिहासिक गाेलने अात्मविश्वास द्विगुणित झालेला यजमान भारतीय युवा संघ अाता फिफाच्या १७ वर्षांखालील फुटबाॅल वर्ल्डकपमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज अाहे.
  मात्र, यासाठी भारताला गुरुवारी अ गटातील अापल्या शेवटच्या सामन्यात दाेन वेळच्या चॅम्पियन घानाचे तगडे अाव्हान असेल. स्पर्धेतील अापले अाव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही शेवटची संधी अाहे. दुसरीकडे बुधवारी दाेन वेळच्या मेक्सिकाेचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. इंग्लंडने फ गटात मेक्सिकाेला धूळ चारली.
  दुसरीकडे २००९ च्या चॅम्पियन फ्रान्स युवा संघाने इ गटात सलग दुसरा विजय संपादन केला. फ्रान्सने सामन्यात जपानला पराभूत केले. यासह फ्रान्सने गटातील अापले अाव्हान मजबूत केले. मात्र, जपानच्या पुढील फेरीतील प्रवेशाच्या मार्गात माेठी अचडण निर्माण झाल्याचे चित्र अाहे. तसेच हाेंडुरस टीमने कॅलेडाेनियावर ५-० ने मात केली. त्यापाठाेपाठ इराकच्या टीमने ३-० ने चिलीचा पराभव केला. यासह इराकने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. चिलीचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

  इंग्लंडने सरस खेळीच्या बळावर सामन्यात मेक्सिकाेवर ३-२ अशा फरकाने मात केली. ब्रेेवेस्टर (३९ वा मि.), फाेडेन (४८ वा मि.) अाणि सांचाेने (५५ वा मि.) प्रत्येकी एक गाेल करून इंग्लंडला राेमहर्षक विजय मिळवून दिला. दाेन वेळच्या विश्वविजेत्या मेक्सिकाेसाठी लेईनेझने (६५, ७२ वा मि.) सात मिनिटांच्या फरकाने सलग दाेन गाेल केले. त्यामुळे मेक्सिकाेला अपयशाला सामाेरे जावे लागले. यामुळे मेक्सिकाेचा गुणतालिकेत १ गुण अाहे. या टीमचा गत सामना बराेबरीत राहिला हाेता.
  फ्रान्सचा जपानवर विजय
  अाॅलिम्पियन लियाेन अामिने गाेयुरी (१३, ७१ वा मि.) गाेल करून फ्रान्सला राेमहर्षक विजय मिळवून दिला. या गाेलच्या बळावर फ्रान्सने बुधवारी इ गटातील सामन्यात जपानचा पराभव केला. फ्रान्सने २-१ ने सामना जिंकला. एक वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सच्या विजयात गाेयुरीने दाेन गाेलचे याेगदान दिले. त्यामुळे फ्रान्सला सहज विजय संपादन करता अाला. जपानकडून मियाशिराेने (७३ वा मि.) पेनाल्टी काॅर्नरवर गाेलचे खाते उघडले.

Trending