आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक व्यसनाधीन, अाजीने घेतले या जिम्नॅस्टिक चॅम्पियन सिमाेनला दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमाेन बाइल्स मैदानावर असली की प्रतिस्पर्धांमध्ये नेहमीच वरचढ ठरते. मायकेल जाॅर्डन अाणि काेबे ब्रायंटसारख्या तगड्या बास्केटबाॅलपटूंसारखे मैदानावर दबदबा निर्माण करण्याचे कसब तिच्यात अाहे. इतर खेळांतील यशस्वी खेळाडूंसारखीच सिमाेन ही जिम्नॅस्टिकची चॅम्पियन अाहे. मात्र, तिला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी तिला संघर्ष करावा लागला. सिमाेन ही १९ वर्षांची अाहे, मात्र इतक्या कमी वयातही तिने अायुष्यात सुख-दु:खाचे अनेक चढ-उतार पाहिले अाहेत.
१४ मार्च १९९७ रोजी अाेहियाेत जन्मलेल्या सिमाेनला चार भाऊ-बहीण अाहेत. तिच्या अाई-वडिलांना ड्रग्ज सेवनाचे माेठे व्यसन हाेते. याशिवाय ते दाेघेही मद्यप्राशन करत हाेते. त्यामुळेच त्यांनी अापल्या मुलांना वाऱ्यावर साेडले. मात्र, सिमाेनच्या अाजी-अाजाेबांनी या सर्वांना निवारा दिला. त्यांना दत्तक घेऊन मायेची ऊब दिली. सहा वर्षांची असतानाच सिमाेन ही अापल्या अाजी-अाजाेबांकडे राहायला अाली. राॅनी अाणि नेलिए बाइल्स हे अाजी-अाजाेबा या सर्व भावंड्यावर अधिक प्रेम करत हाेते.

सिमाेन ही वयाच्या ६ व्या वर्षी अापल्या मैत्रिणींसाेबत एका सहलीवर गेली हाेती. त्यादरम्यान, तिने जिम्नाॅस्टिक या खेळातील कसरती पाहिल्या. याची तिला चांगलीच भुरळ पडली अाणि ती या खेळाच्या प्रेमात पडली. याची तिने एका प्रशिक्षकांच्या अाधारे माहिती मिळवली. या वेळी तिला प्रशिक्षकाने जिम्नॅस्टिक करण्याचा सल्ला दिला. यातूनच तिने या खेळाचा छंद जाेसापण्यास सुरुवात केली. तिला वयाच्या अाठव्या वर्षी एमी बाेरमेन यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली ती या खेळाचे धडे गिरवू लागली. ४ फूट अाणि ६ इंच उंची असलेली सिमाेन सुरुवातीला अाठवड्यातील २० ते २२ तास या खेळाच्या सरावाला देत असे. यासाठी तिने अथक परिश्रम घेतले. सर्वाधिक वेळ सरावावर देत तिने यातच अापले करिअर करण्याचा निर्धार केला. त्यानंतर तिने यात प्रावीण्य मिळवण्यास सुरुवात केली. यासाठी तिने अनेक माेठ्या स्पर्धांमधील अापला सहभाग वाढवला. तसेच यात तिने उल्लेखनीय कामगिरीतही यश संपादन केले. जिम्नॅस्टिकमध्ये प्राेडुनाेवा व्हाॅल्ट हा सर्वात कठीण प्रकार अाहे.
यात अनेक खेळाडू अपयशी ठरतात. मात्र, यात भारताच्या दीपा कर्माकर तरबेज अाहे. याचाच प्रत्यय तिने रिअाे अाॅलिम्पिकमध्ये अाणला. त्यामुळेच प्राेडुनाेवाला अाता दीपाच्या नावाने अाेळखले जावे, अशी प्रतिक्रियाही सिमाेनने दिली. तिने भारताच्या दीपावर काैतुकाचा वर्षाव केला. कारण या वेळी तिची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. मात्र, भारताच्या दीपाला या गटात चाैथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटात अमेरिकेची सिमाेन ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
उल्लेखनीय कामगिरी
विक्रम
- रिअाे अाॅलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण, १ कांस्यपदक
- वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १० सुवर्ण, २ राैप्य, २ कांस्यपदके
- अाॅलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिपध्ये सुवर्ण जिंकणारी सहावी महिला खेळाडू ठरली
- सलग तीन जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकली
- कमाई- १३ काेटी रुपये.
बातम्या आणखी आहेत...