न्यूयॉर्क- अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने सोमवारी ग्रँडस्लॅम स्पर्धेत
आपला ३०८ वा विजय मिळवला. यासह तिने ४८ वर्षांच्या ओपन युगात सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजयाचा विक्रम आपल्या नावे केला आहे. ३४ वर्षीय सेरेनाने या िवजयासह रॉजर फेडररचा ३०७ विजयांचा विक्रम मोडला. मार्टिना नवरातिलोवा (३०६) विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सेरेनाने कझाकिस्तानच्या यारोस्लावा श्वेडोवाला ६-२, ६-३ ने पराभूत करताना हा विक्रम केला.
१९वर्षांत खेळली ३५० सामने
सेरेनानेपहिला ग्रँडस्लॅम सामना १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळला. तेव्हापासून आतापर्यंत तिने ३५० ग्रँडस्लॅम सामने खेळले. यात ३०८ विजय आणि ४२ सामने गमावले. सेरेनाप्रमाणे फेडररचेही ग्रँडस्लॅम करिअर १९ वर्षांचे आहे. यादरम्यान त्याने ३०७ सामने जिंकले आणि ५१ गमावले.
यूएसओपनमध्ये ८८ विजय : सेरेनानेसर्वाधिक ८८ ग्रँडस्लॅम सामने यूएस ओपनमध्ये जिंकले. यानंतर विम्बल्डनमध्ये ८६, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ७४ आणि फ्रेंच ओपनमध्ये ६० सामने जिंकले आहेत. सेरेनाने सर्वाधिक १२ सामने फ्रेंच ओपनमध्ये गमावले.
४०सामने अधिक जिंकूनही किताब मार्गारेटपेक्षा कमी : सेरेनाच्यानावे तब्बल २२ ग्रँडस्लॅम किताब आहेत. मार्गारेट कोर्ट २४ किताबांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सेरेनाने मार्गारेटच्या तुलनेत ४० सामने अधिक जिंकले. तरीही किताबामध्ये ती तिच्यापेक्षा मागे आहे. मार्गारेटने २६८ विजय आणि २२ सामने गमावले.
सानिया-स्ट्रायकोवा क्वार्टर फायनलमध्ये
महिला दुहेरीत जगातील नंबर वन खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार चेक गणराज्यची बारबरा स्ट्रायकोवा यांनी शानदार कामगिरी करताना क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सानिया-स्ट्रायकोवा जोडीने निकोल गिब्ज आणि नाओ हिब्स या अमेरिकन-जापनिज जोडीला ६-४, ७-५ ने हरवले. क्वार्टर फायनलमध्ये सानिया-स्ट्रायकोवा समोर फ्रान्सच्या कॅरोलिना गॅरसिया आणि क्रिस्टिना माल्दोनविकचे आव्हान असेल.
आनंददायक विजय
याराेस्लावावर विजयानंतर आनंदित झालेली सेरेना विल्यम्स.
> विजयाचा हाआकडा मोठा आहे. असे किती विजय मिळवेन माहिती नाही. बघूया. मी आणि फेडरर दोघे बरीच वर्षे खेळू, असा विश्वास आहे.
-सेरेना विल्यम्स, विजयानंतर.
अँडी मरेची आगेकूच
दुसरामानांकित आणि इंग्लंडचा खेळाडू अँडी मरेने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवला ६-१, ६-२, ६-२ ने पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. मरेने हा सामना सरळ सेटमध्ये आपल्या नावे केला. अाता त्याचा सामना जपानच्या केई निशिकोरीशी होईल. निशिकोरीने ३७ वर्षीय इवान कार्लोविकला ६-३, ६-४, ७-६ (७-४) ने हरवले.