आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • US Open Kei Nishikori Stuns Andy Murray Serena Williams Beats Simona Halep

US ओपन: निशिकोरीचा मरेला धक्का; हालेपचा संघर्षमय खेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- जगातला नंबर दोन आणि दोन वेळेसचा ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मरेला जपानच्या केई निशिकोरीकडून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. महिला खेळाडूंत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले.

पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये निशिकोरीने दुसरा मानांकित मरेला पाच सेटच्या संघर्षपूर्ण सामन्यात १-६, ६-४, ४-६, ६-१, ७-५ ने हरवले. २०१४ चा यूएस ओपनचा उपविजेता निशिकोरीने पाचव्या सेटच्या अकराव्या गेममध्ये मरेची सर्व्हिस मोडताना विजय आपल्या नावे केला. या वर्षी जबरदस्त यशस्वी ठरलेल्या मरेने सलग सात स्पर्धांच्या फायनलमध्ये स्थान मिळवले होते. मरेने या वर्षी विम्बल्डनमध्ये किताब जिंकताना ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. क्विन्स क्लब आणि रोम येथेसुद्धा त्याने विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये योकोविकविरुद्ध मरेच खेळेल, अशी आशा होती. मात्र, निशिकोरीने मरेला धक्का दिला.
महिला एकेरीत जगातली नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्सने रोमानियाच्या सिमोना हालेपला तीन सेटमध्ये ६-२, ४-६, ६-३ ने हरवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पाचवी मानांकित सिमोना या स्पर्धेतील अशी पहिली खेळाडू ठरली, जिने सेरेनाविरुद्ध सेट जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र, सामन्यात सेरेनाने बाजी मारली.

निशिकोरीचा जोरदार संघर्ष
मरेने पहिल्या सेटमध्ये निशिकोरीला एकतर्फी शैलीत ६-१ ने हरवले. या सेटमध्ये जपानच्या खेळाडूने १४ साध्या चुका केल्या. दुसरा सेट ४-६ ने गमावल्यानंतर मरेने तिसरा सेट ६-४ ने जिंकून पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये स्कोअर ३-३ असा असताना थाेडा पाऊस झाला. यामुळे पोर्टेबल छत बंद करावे लागले. यामुळे सामना जवळपास २० मिनिटे थांबला होता. मात्र, या सेटमध्ये निशिकोरीने पुनरागमन केले. तिसरा सेट गमावल्यानंतर निशिकोरीने पुढचे दोन्ही सेट जिंकून सामना आपल्या नावे केला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. दोघांचे स्ट्रोक आणि नेट प्ले शानदार होते. यात १७ वेळा सर्व्हिस ब्रेक झाली. निशिकोरीने अखेरच्या दोन्ही सेटमध्ये प्रभावी खेळ केला.

दोन वर्षांपूर्वीसुद्धा निशिकोरीने फायनल गाठली होती
कोर्टवर खूप मजा आली. स्वत:वर नियंत्रण ठेवणे मला कठीण झाले होते. सामना खूपच चढ-उताराचा होता. अखेर मी जिंकलो. या विजयामुळे मी खूप आनंदी आहे. -केई निशिकोरी, विजयानंतर.

वावरिंका अंितम चारमध्ये
सहावा मानांकित निशिकोरीसमोर आता तिसरा मानांकित स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंकाचे आव्हान असेल. वावरिंकाने माजी चॅम्पियन अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला चार सेटमध्ये ७-६, ४-६, ६-३, ६-२ ने हरवले.

मी चुका केल्या
मी मिळालेल्या संधीचा फायदा उचलला नाही. यामुळे सामना तिसऱ्या सेटमध्ये गेला. मी काही चुका केल्या. दुसऱ्या सेटमध्ये हालेपने कमालीचा खेळ केला. तिने सर्व १२ ब्रेक पॉइंट मिळवले.
-सेरेना िवल्यम्स. विजयानंतर.
बातम्या आणखी आहेत...