आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांआधी सोडले होते टेनिस; आता दबदबा; अॅनास्ताशिया यूएस ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- तीनवर्षां पूर्वी तिने सुमार प्रदर्शन आणि दुखापतीमुळे टेनिस खेळणे सोडले होते. २०१२ मध्ये तिची रँकिंग १८१ पर्यंत घसरली होती. आपल्या खेळाने ती निराश झाली होती. यामुळे खेळ सोडून ऑस्ट्रियाला जाऊन तिने व्यवस्थापनाचे शिक्षण सुरू केले. अभ्यासही सुरू केला. मात्र, आता ती यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे.

लात्वियाच्या अॅनास्ताशिया सेवास्तोवाची ही कथा आहे. अॅनास्ताशिया प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये खेळेल. यूएस ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये २२ वर्षांनंतर पोहोचणारी ती आपल्या देशाची पहिली खेळाडू ठरली आहे. तिने दुसऱ्या फेरीत फ्रेंच ओपनची चॅम्पियन गर्बाइन मुगुरुजाला हरवून धक्कादायक निकाल मिळवला होता. फेब्रुवारी २०१५ मध्ये तिची वर्ल्ड रँकिंग ८८५ पर्यंत घसरली. मात्र, आता तिने टॉप-५० खेळाडूंत प्रवेश केला आहे. याबाबत २६ वर्षीय अॅनास्ताशिया म्हणते, “तीन वर्षांपूर्वी माझी टेनिस कारकीर्द संपली होती. प्रदर्शन सुमार दर्जाचे होते. मी सलग पराभूत होत होती. रॅकिंगमध्ये घसरण झाल्याने मी मानसिकरीत्या खचली होती. दुखापतींनीही त्रस्त होती. मी दुखापतीतून बरी झाल्यानंतर परत कोर्टवर यायची आणि पुन्हा जखमी व्हायची. असेच सुरू होते. मी शारीरिक पातळीवरही थकली होती. यामुळे टेनिसमधून ब्रेकचा निर्णय घेतला. नंतर अभ्यासात लागली. ऑस्ट्रियात जाऊन मॅनेजमेंटचे शिक्षण सुरू केले. नंतर मी अकाउंटिंग, मॅनेजमेंट आणि मार्केंटिंगचा अभ्यास सुरू केला. मुलांनाही शिकवले. सकारात्मक ऊर्जा मिळाली. खेळ सोडू नये, असे वाटू लागले. फेब्रुवारी २०१५ पासून पुन्हा खेळाकडे वळली. मात्र, यावेळी मी शारीरिक आणि मानसिक पातळीवर खूप मजबूूत होती. खेळ सुधारला आणि रँकिंगही सुधारली.

बेल्जियमच्याकिम क्लिस्टर्सने २००५ मध्ये पहिल्यांदा यूएस ओपन जिंकले होते. दोन वर्षांनी तिने टेनिसमधून निवृत्ती घेतली. २००९ मध्ये ती पुन्हा टेनिस कोर्टवर परतली. अवघ्या तीन डब्ल्यूटीए स्पर्धा खेळल्यानंतर ती यूएस ओपनची चॅम्पियन बनली. वाइल्ड कार्ड मिळवून विजेता ठरलेली ती पहिली खेळाडू ठरली. नंतर पुढच्या वर्षीही तिने सलग दुसऱ्यांदा यूएस ओपन जिंकले होते.
बातम्या आणखी आहेत...