आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Open: Sania Mirza Martina Hingis Ease Through To Quarter finals

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन ओपन टेनिस : सानिया-हिंगीस क्वार्टर फायनलमध्ये दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारताची नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस जोडीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. इंडो-स्विस जोडीने तिसर्‍या फेरीत सहज विजय मिळवत आगेकूच केली. पुरुष एकेरीत नंबर वन सर्बियाचा नोवाक योकोविक, मारिन सिलिच तर महिला गटातील नंबर वन अमेरिकेची सेरेना विल्यम्स, तिची बहीण व्हीनस विल्यम्स यांनीसुद्धा विजय मिळवत आगेकूच केली आहे. सेरेना-व्हीनसचा क्वार्टर फायनलमध्ये सामना होणार आहे. अर्थात एका बहिणीचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीत थांबेल.

अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने १३ वी मानांकित हॉलंड आणि चेक गणराज्यची जोडी निकोला क्राजिसेक आणि बारबोरा स्त्रीकोवा यांना दोन सेटमध्ये हरवले. सानिया-हिंगीसने ६-३, ६-० ने सहज विजय मिळवला. इंडो-स्विस जोडीने अवघ्या ५९ मिनिटांत सामना आपल्या नावे केला. सानिया-हिंगीसने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना विरोधी जोडीला एकही संधी दिली नाही. पहिल्या सेटमध्ये सानिया-हिंगीसने एकदा सर्व्हिस मोडताना तब्बल १४ विनर्स मारले. विरोधी जोडीला त्या तुलनेत अवघे ८ विनर्स मारता आले. पहिला सेट त्यांनी ३३ मिनिटांत जिंकला. दुसरा सेट त्यांनी ६-० ने जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये सानिया-हिंगीस जोडीला ६ ब्रेक पाॅइंट मिळाले. दुबळी सर्व्हिस, ९ साध्या चुका, मैदानावर संथ खेळामुळे बारबोरा स्त्रीकोवा आणि निकोला क्राजिसेक यांचा पराभव झाला. सानिया-हिंगीस जोडीचा पुढचा सामना नववी मानांकित चीन-तैपेईची जोडी युंग जान चान आणि हू चिंग चान यांच्याशी होईल.
महिला गटात आणखी एका सामन्यात फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लादेनोविचने रशियाच्या एकतेरिना माकारोवाला ७-६, ४-६, ६-१ अशा फरकाने धुळ चारली. तसेच इटलीच्या रॉबर्टो विन्सीला पुढे चाल मिळाली. तिची विरोधी खेळाडू कॅनडाची युजिनी बुकार्ड दुखापतीमुळे खेळण्यास आली नाही.

योकोविकला कॉनर्सच्या विक्रमाची संधी
सर्बियाच्या नोवाक योकोविकला स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता एगुटविरुद्ध विजयासाठी तीन तास संघर्ष करावा लागला. अव्वल मानांकित खेळाडूला पहिल्यांदा चौथा सेट खेळावा लागला. त्याने हा सामना ६-३, ४-६, ६-४, ६-३ ने जिंकला. योकोविकने ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलग २६ व्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत योकोविकपेक्षा चांगला रेकॉर्ड फक्त रॉजर फेडरर (३६) आणि जिमी कॉनर्स (२७) या दोन खेळाडूंचाच आहे. नोवाक यूएस अोपनमध्ये सलग नववे सेमीफायनल खेळण्यासाठी एक पाऊल दूर आहे.

सेरेना-व्हीनस समोरासमोर
अव्वल मानांकित सेरेनाने चौथ्या फेरीत १९ वी मानांकित मेडिसन किजला ६-३, ६-३ ने हरवले. २३ वी मानांकित व्हीनसने एस्टोनियाच्या एनेट कोंटावेटवर ६-२, ६-१ ने मात केली. आता दोघी २७ व्यांदा समोरासमोर असतील. आतापर्यंत २६ सामन्यांत सेरेना १५-११ ने पुढे आहे.

सिलिचचा सामना सोंगाशी
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत क्रोएशियाच्या मारिन सिलिचने फ्रान्सच्या जेर्मी चार्डीला ६-३, २-६, ७-६, ६-१ ने हरवले. त्याने यूएस ओपनमध्ये सलग ११ वा विजय मिळवला. आता त्याचा सामना फ्रान्सच्या जो. विल्फ्रेड सोंगाशी होईल. १९ वा मानांकित सोंगाने आपल्याच देशाच्या बेनाएट पेयरला ६-४, ६-३, ६-४ ने हरवले.