आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • US Open: Serena Williams Stunned In Semi final Loss As Karolina Pliskova Sets Up Final Against No 1 Angelique Kerber

१९ वर्षांनंतर जर्मन खेळाडू नंबर वन; १८६ आठवड्यांनंतर सेरेनाची घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने यूएस ओपन टेनिस स्पर्धेत चेक गणराज्यच्या कॅरोलिना प्लिस्कोवाकडून सेमीफायनलमध्ये सरळ सेटमध्ये ६-२, ७-६ ने पराभूत झाल्याने नंबर वनचा ताज गमावला. ती विक्रमी १८६ आठवड्यांपासून अव्वलस्थानी राहिली होती. तिच्या जागी आता जर्मनीची अँजोलिक कर्बर या नव्या स्टारचा उदय झाला. तिने अंतिम चारच्या लढतीत कॅरोलिन वोज्नियाकीला ६-४, ६-३ ने पराभूत केले. २८ वर्षांनी कर्बर महिला एकेरीच्या नंबर वन स्थानावर पोहोचणारी दुसरी जर्मन खेळाडू आणि एकूण २२ वी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी जर्मनीच्या स्टेफी ग्राफने हे यश मिळवले आहे. स्टेफी ३० मार्च १९९७ पर्यंत अव्वलस्थानी होती.
केवळएका सामन्यामुळे वाचला स्टेफीचा विक्रम
सेरेनाजर आणखी एक सामना जिंकली असती तर सलग सर्वाधिक आठवडे नंबर वन राहण्याचा विक्रम तिच्या नावावर लागला असता. आता १८६ आठवड्यांचा संयुक्त विक्रम स्टेफी ग्राफ आणि सेरेनाच्या नावे आहे. स्टेफी अापल्या करिअरमध्ये ३७७ आठवडे नंबर वन राहिली आहे. दुसरीकडे मार्टिना नवरातिलोवा ३३२ आठवडे नंबर वनसह दुसऱ्या, तर ३४ वर्षीय सेरेना ३०९आठवडे नंबर वन राहण्यात तिसऱ्या स्थानी आहे. सेरेना ओपन एरा (१९६८ पासून) सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रमदेखील मोडू शकली नाही. दोघींच्या नावे २२-२२ ग्रँण्ड स्लॅम आहेत.
अँजोलिक कर्बरचा जन्म (१८ जानेवारी १९८८) झाला त्या वेळी ऑस्ट्रेलियन ओपन सरू होते.जन्माच्या पाच दिवसांनंतरच स्टेफी ग्राफने महिला एकेरीचा किताब पटकावला. हा स्टेफी ग्राफचा दुसरा ग्रँडस्लॅम किताब होता. या किताबासह ती जर्मनीची स्टार खेळाडू बनली. अँजोलिकचे वडील स्लाओमीर कर्बरसुद्धा स्टेफीचे चाहते होते त्यांची इच्छा होती की, आपली मुलगीसुद्धा स्टेफीसारखी टेनिसस्टार व्हावी. यामुळे त्यांनी केवळ वर्षे वयाच्या अँजोलिकचा प्रवेश थेट टेनिस अकादमीत केला. २५ वर्षांनंतर नंबर वन बनत तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याचबरोबर तिने स्टेफी ग्राफचे दोन विक्रम मोडण्यापासून वाचवले. एक सलग सर्वाधिक आठवडे नंबर वन राहणे दुसरा एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणे हे विक्रम अबाधित राहिले.
सेमीफायनलमध्ये सेरना विल्यम्सला हरवणारी कॅरोलिना प्लिस्कोवा स्वत: सेरेनाची चाहती असल्याचे सांगते. त्याचे कारण असे की, कॅराेलिना तिची बहीण क्रिस्टिनाला लहानपणी विल्यम्स भगिनी (सेरेना व्हीनस) सारख्या टेनिसस्टार बनण्याची इच्छा होती. ज्या अकादमीत त्या खेळायला जात तेथील इतर खेळाडू त्यांना विल्यम्स सिस्टर्स नावाने हाक मारत असत. प्लिस्कोवा भगिनी जन्मत: जुळ्या आहेत. मात्र, या खेळात कॅरोलिना खूप पुढे आहे. ती जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर पोहोचली आहे. तसेच क्रिस्टिना अजूनही टॉप १०० च्या बाहेर आहे. सेरेनासारखीच कॅरोलिनाही तिच्या दमदार सर्व्हिससाठी ओळखला जाते. या वर्षी तिने आतापर्यंत ४३९ ऐस मारले आहेत. ही संख्या माजी नंबर सेरेनाच्या ११९ अधिक आहे.
बातम्या आणखी आहेत...