आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारापाेवा, मुगुरुझाची अागेकूच; सानिया मिर्झा, बाेपन्ना पराभूत; व्हीनसची अंतिम १६ मध्ये धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 न्यूयाॅर्क- माजी नंबर वन मारिया शारापाेवा, दाेन वेळची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स अाणि तिसऱ्या मानांकित मुगुरुझाने अापली लय कायम ठेवताना शनिवारी सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे भारताच्या लिएंडर पेसने अापला सहकारी पुरव राजासाेबत अागेकूच केली. मात्र, सानिया मिर्झा अाणि राेहन बाेपन्नाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यांचे सत्रातील शेवटच्या स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.   
 

चेक गणराज्यच्या पेत्रा क्विताेवाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत शानदार विजय संपादन केला. तिने लढतीमध्ये फ्रान्सच्या कॅराेलीन गार्सियाला पराभूत केले. तिने ६-०, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह तिने अापली लय कायम ठेवली. पराभवामुळे गार्सियाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अाता तिचा सामना मुगुरुझाशी हाेईल.   
 

मुगुरुझाचा एकतर्फी विजय 
विम्बल्डन चॅम्पियन अाणि तिसऱ्या मानांकित मुगुरुझाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एकतर्फी विजय मिळवला. तिने सामन्यात स्लाेव्हाकियाच्या मैगदालेना रिबारिकाेवाचा पराभव केला. तिने ६-१, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने पुढची फेरी गाठली. दुसरीकडे १६ व्या मानांकित सेवात्साेवाने लढतीत वेकिटचा ६-२, ६-३ अशा फरकाने पराभव केला.   
 
 
व्हीनसचा शानदार विजय 
अमेरिकन स्टार टेनिसपटू व्हीनसने महिला एकेरीमध्ये ग्रीसच्या मारिया सकारीला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. तिने ६-३, ६-४ ने विजयश्री खेचून अाणली. यासाठी तिला १ तास १५ मिनिटे शर्थीची झुंज द्यावी लागली. यासह व्हीनसने सत्राच्या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश करण्याची लय कायम ठेवली. यापूर्वी तिने २०१० मध्ये हे यश संपादन केले हाेते.
 
 
सानिया, राेहन बाेपन्ना दुहेरीत अपयशी
सानियाला मिश्र दुहेरीत व  बाेपन्नाला पुुरष दुहेेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  बाेपन्ना अाणि पाब्लाे क्युवासला  फाेगनिनी-सिमाेनने ५-७, ६-४, ६-४ ने पराभूत केले. दुसरीकडे येलेना अाेस्तापेंकाे अाणि फेब्रिस मार्टिनने मिश्र दुहेरीत सानिया-डाेडिंगवर मात केली. त्यांनी ५-७, ६-३, १०-६ ने मात केली.
 
 
पेस-पुरवची विजयी सलामी 
भारताच्या अनुभवी टेनिसस्टार लिएंडर पेसने अापला नवीन सहकारी पुरव राजासाेबत पुुरुष दुहेरीत विजयी सलामी दिली. या जाेडीने लढतीत ट्राेइस्की-टीस्पारेविकवर ६-१, ६-३ ने मात केली. अाता या जाेडीवर खास नजर असेल. पहिल्यांदाच हे दाेघे दुुहेरीत साेबत खेळत अाहे. पेसच्या अनुभवाचा माेठा फायदा युवा खेळाडू पुरवला हाेत अाहे. 
 
 
मारिया शारापाेवाचा सहज विजय 
रशियन टेनिसस्टार मारिया शारापाेवाने शानदार कमबॅक करताना अापली विजयी लय कायम ठेवली. तिने सामन्यात अमेरिकेच्या युवा खेळाडू साेफिया केनिनचा पराभव केला. तिने ७-५, ६-२ अशा फरकाने सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह तिने अंतिम १६ मधील अापला प्रवेश निश्चित केला. अाता तिचा सामना अनास्तासिजा सेवस्ताेवाशी हाेईल.
बातम्या आणखी आहेत...