जमैका- जगातीलसर्वांत वेगवान धावपटू उसेन बोल्टला शुक्रवारी जमैकन ट्रॅक अँड फील्ड ट्रायलच्या १०० मीटर स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे भाग घेता आला नाही. बोल्टने सोशल मीडियावर ही माहिती देताच जमैकासह जगभरातील क्रीडाप्रेमी स्तब्ध झाले. खरे तर त्याच्या चाहत्यांना रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला पाहावयाचे आहे.
वास्तविक २९ वर्षीय उसेन बोल्ट अद्याप रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलेला नाही. जमैकाकडून तो १००, २०० बाय १०० मीटर रिले स्पर्धेत भाग घेतो. या दुखापतीमुळे जमैका आणि रिओ ऑलिम्पिकचे आयोजकही अस्वस्थ आहेत. गेल्या वेळी ऑलिम्पिकमध्ये सुमारे काेटी लोकांनी बोल्टला १०० मीटरच्या अंतिम फेरीत धावताना पाहिले आहे. गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये बोल्टने सुवर्णपदके जिंकली. विशेष म्हणजे जमैकाला दोन ऑलिम्पिकमध्ये जी दहा सुवर्णपदके आहेत, त्यातील सहा बोल्टची आहेत. रविवारी २०० मीटरसाठी ऑलिम्पिक पात्रता फेरी होत आहे. यात बोल्ट भाग घेऊ शकणार नाही. शुक्रवारी पहिल्या पात्रता फेरीत बोल्टने १०.१५ सेकंद वेळ नोंदवला होता. २०१६मध्ये गेल्या चार स्पर्धांतील ही सर्वांत वाईट कामगिरी होती. बोल्ट जखमी झाल्याने जमैकाच्याच योहान ब्लॅकने १०० मीटर शर्यत िजंकली आहे. असे असले तरी जमैकाच्या अॅथेलेटिक्स नियमांतर्गत बोल्टला ऑलिम्पिकमध्ये सहभागाची परवानगी मिळू शकते. बोल्टचे प्रशिक्षक ग्लेन मिल्स यांनी सांगितले, बोल्टची दुखापत गंभीर आहे. ऑलिम्पिकपर्यंत काय सुधारणा होते याकडे आमचे लक्ष आहे.
२२ जुलै रोजी रिओसाठी लंडनमध्ये धावेन : बोल्ट
सोशल मीडियावर बोल्ट म्हणतो, पहिल्या फेरीनंतर रात्री आणि पुन्हा उपांत्य फेरीत मला गुडघ्यात काही वेदना जाणवल्या. म्हणूनच मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जमैकातील १०० मीटर जागतिक शर्यत सोडून माघार घेत आहे. उपचारांनंतर मी पुन्हा तेवढ्याच क्षमतेने धावू शकेन, अशी आशा आहे. २२ जुलै रोजी लंडनमधील स्पर्धेत मी पुन्हा धावेन. खरे तर लंडनमधील ही प्रतिष्ठित स्पर्धाच माझ्यासाठी रिओ ऑलिम्पिकची पात्रता फेरी असेल.
पुढील स्लाइ्जसवर पाहा, बोल्टने सोशल मेडियावर शेअर केलेला फोटो...