आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेल्टची अाता युनायटेडकडून किक, निवृत्तीनंतर फुटबाॅल मैदानावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगस्टन - जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बाेल्टचे बालपणीचे फुटबाॅल खेळण्याचे स्वप्न अाता पूर्ण हाेणार अाहे. ताे  फुटबाॅलच्या मैदानावर फुटबाॅल किक मारताना दिसणार अाहे. त्याला याची संधी मँचेस्टर युनायटेडकडून मिळणार अाहे. येत्या २ सप्टेंबर राेजी मँचेस्टर युनायटेड अाणि बार्सिलाेना यांच्यात चॅरिटी लिजेंड सामन्याचे अायाेजन करण्यात अाले.
 
या सामन्यात बाेल्ट हा मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधित्व करेल.  बाेल्टने नुकतीच अॅथलेटिक्समधून निवृत्ती घेतली. २०१२ मध्ये बाेल्ट हा युनायटेडच्या हाेम ग्राउंडवर (अाेल्ड ट्रॅफर्ड) गेला हाेता. त्यादरम्यान त्याला क्लबच्या वतीने एक जर्सी भेट देण्यात अाली हाेती. यावर ९.६३ असे लिहिले अाहे. त्याने २०१२ लंडन अाॅलिम्पिकमध्ये १०० मीटरची रेस जिंकण्यासाठी ही वेळ नाेंदवून सुवर्णपदक जिंकले हाेते.
 
बाेल्टसाेबत युनायटेडचे माजी खेळाडू मैदानावर
बाेल्ट फुटबाॅल सामना खेळणार असल्याने मँचेस्टर युनायटेडच्या अनेक माजी खेळाडूंनीही मैदानावर उतरण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये बाेल्टसाेबत रेयान गिग्ज, पाॅल स्काेल्स, फिल नेविल, वेन डरसारख्या युनायटेडच्या माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश अाहे. या सामन्याच्या तयारीसाठी अाता बाेल्ट हा जर्मन क्लब बाेरुसिया डाॅर्टमेंडसाेबत सराव करत अाहे. या सामन्यात बार्सिलाेनाचा मेसी खेळण्याची शक्यता फार कमी अाहे.
 
युनायटेडकडून खेळण्याचे स्वप्न साकारणार : मँचेस्टर युनायटेडकडून खेळण्याचे माझे बालपणापासूनचे स्वप्न हाेते. अाता हे स्वप्न साकारण्याची वेळ जवळ अाली अाहे. त्यासाठी मी फुटबाॅल  मैदानावर उतरण्यासाठी उत्सुक अाहे. हा स्वप्नपूर्तीचा क्षण माझ्या अायुष्यातील महत्त्वपूर्ण असेल,’ अशी प्रतिक्रिया बाेल्टने दिली.
बातम्या आणखी आहेत...