आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये बोल्टला १०० मी.चे सुवर्णपदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ - सर्वाधिक वेगवान युसेन बोल्टने पुन्हा एकदा १०० मीटर शर्यतीत आपणच “दादा’ असल्याचे सिद्ध केले. रिओ ऑलिम्पिकमध्येसुद्धा त्याने १०० मी. पुरुषांच्या शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. सलग तीन ऑलिम्पिकमध्ये १०० मी. शर्यतीचे सुवर्णपदक जिंकणारा तो १२० वर्षांच्या मॉडर्न ऑलिम्पिक (१८९६ पासून) इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. २९ वर्षीय बोल्टने रिओ ऑलिम्पिकमध्ये १०० मीटरची शर्यत ९.८१ सेकंदांत पूर्ण केली. बोल्टचा प्रतिस्पर्धी अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिनने रौप्यपदक तर कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासने कांस्यपदक जिंकले.

बाेल्टने मंळवारी २०० मीटर धावण्याच्या शर्यतीची उपांत्य फेरी गाठली.यासाठी गॅटलीनही पात्र ठरला आहे.

संथ सुरुवात केली....
फायनलमध्ये बोल्टने एका धावपटूला सोडून सर्वात संथ सुरुवात केली. सुरुवातीचे ५० मीटर जस्टिन गॅटलिन पुढे होता. यानंतर बोल्टने जबरदस्त वेग दाखवला व रेस जिंकली. १०० मीटरचे सुवर्णपदक जिंकताच बोल्टच्या ऑलिम्पिक पदकांची संख्या ७ झाली आहे. १०० मीटर शर्यतीच्या हिटमध्ये त्याने १०.०७ सेकंदांचा वेळ काढला होता. िरओत बोल्ट २०० मीटर व ४ बाय १०० मीटर रिले रेसमध्येसुद्धा सहभागी होणार आहे.

यापूर्वी बोल्टने बीजिंग २००८ मध्ये आणि लंडन २०१२ मध्ये १०० मीटर, २०० मीटर व ४ बाय १०० मीटर रिले रेसची ६ सुवर्णपदके जिंकली होती. २००८ पासून ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिपसह बोल्टने आतापर्यंत १८ सुवर्णपदके जिंकली आहेत.

गत ऑलिम्पिकमध्ये १०० मी. मध्ये बोल्ट
२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टने ९.६९ सेकंदांचा वेळ काढला होता.
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बोल्टने ९.८२ सेकंदांचा वेळ काढला.
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बोल्टने गत आलिम्पिकच्या तुलनेत ०.०१ सेकंदाने सुधारणा करताना ९.८१ सेकंदांचा वेळ घेतला.

गॅटलिनला रौप्यपदक
अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिनने ९.८९ सेकंदांचा वेळ काढून रौप्यपदक जिंकले. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये गॅटलिनने सुवर्ण जिंकले होते. कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासने ९.९१ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले.

९.५८ सेकंदांचा विश्वविक्रम
- २००९ च्या बर्लिन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बोल्टने १०० मीटर शर्यतीत ९.५८ सेकंदांचा वेळ काढत विश्वविक्रम केला होता. हा विक्रम अद्याप कायम असून त्याला बोल्टही मोडू शकलेला नाही.
- २००८ पासून आतापर्यंत बोल्टने ७४ रेसमध्ये सहभाग घेतला. यापैकी ६९ रेस त्याने जिंकल्या.

मी फलंदाजापेक्षा चांगला गोलंदाज आहे
एका वर्तमानपत्राशी बोलताना बोल्ट म्हणाला, “तुम्ही याला हॅट्ट्रिक म्हणू शकता. मी फलंदाजापेक्षा चांगला गोलंदाज आहे. यामुळे हॅट्ट्रिक हा शब्द ऐकण्यास चांगला वाटतो. रिओची तयारी कशी केली, हे समजण्यासाठी तुम्हाला माझ्या पुढच्या डॉक्युमेंटरीची प्रतीक्षा करावी लागेल. रिओची तयारी करताना मी नूडल्स आणि चिकन खूप खाल्ले. खूप विश्रांतीही घेतली होती. मी आता अमर झालो आहे, असे मला एकाने सांगितले. मला आणखी दोन पदके जिंकायची आहेत. अमर हाेण्याबाबत नंतर बघूया,’ असेही त्याने यावेळी गंमतीत म्हटले.

तज्ज्ञांच्या मते बोल्ट?
तज्ज्ञांच्या मते बोल्टची खरी शक्ती १०० मीटर शर्यतीतील १०० मीटरपैकी आधीचे ५० मीटर नाही. नंतरचे ५० मीटर हे त्याचे शक्तिस्थान आहे. बोल्टची उंची ६ फूट ५ इंच इतकी आहे. १०० मीटर पूर्ण करण्यासाठी त्याला ४० ते ४१ पावले लागतात. हेच अंतर पार करण्यासाठी इतरांना ४४ ते ४६ पावले लागतात.
बातम्या आणखी आहेत...