आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युसेन बाेल्टची गाेल्डन हॅट्रिक, अाता पुरुष रिलेतील सुवर्णपदकासाठी सज्ज!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बाेल्टने अाॅलिम्पिकमध्ये गाेल्डन हॅट््ट्रिक केली. त्याने गुरुवारी रात्री रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. त्याचे अाॅलिम्पिकमधील या गटाचे हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी त्याने २००८ बीजिंग अाणि २०१२ लंडन अाॅलिम्पिक स्पर्धेत २०० मीटरची रेस जिंकली हाेती.

अाॅलिम्पिक सुवर्णपदकावर नाव काेरण्याच्या इराद्याने ट्रॅकवर उतरलेल्या बाेल्टने १९.७८ सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. यासह ताे या गटातील सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्यापाठाेपाठ कॅनडाच्या अांद्रेने राैप्यपदक पटकावले. त्याने २०.०२ सेकंदांत अंतर पूर्ण करण्याची किमया साधली. तसेच फ्रान्सच्या ख्रिस्ताेफेला कांस्यपदकाने सन्मानित करण्यात अाले.

अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिनला फायनलमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला नाही. त्यामुळे २०० मीटरच्या शर्यतीत बाेल्टला टक्कर देणारा सामर्थ्यवान असा एकही धावपटू नव्हता. त्यामुळे बाेल्टने सहज अंतर पूर्ण करून अव्वल स्थान पटकावले. त्याने चांगली सुरुवात करून कॅनडा व फ्रान्सच्या धावपटूंना पिछाडीवर टाकून या साेनेरी यशाची माेहाेर अापल्या नावे केली. यासह ताे सलग तिसऱ्यांदा अाॅलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने चाैथ्यांदा अाॅलिम्पिक स्पर्धेत जमैकाचे प्रतिनिधित्व केले अाहे. यात त्याच्या नावे ८ सुवर्णपदकांची नाेंद झाली. अाता त्याला ४ बाय १०० मीटर रिलेतही सुवर्णपदकाची संधी अाहे.

जगातील सर्वाेत्कृष्ट खेळाडूसाठी प्रयत्नशील
मला अाता काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. त्यामुळे अाता जगातील सर्वाेत्कृष्ट खेळाडू हाेण्याचा माझा प्रयत्न अाहे. त्यासाठीच मी मेहनत घेतली अाहे. मला पेले अाणि माे. अलींसारखा सर्वाेत्कृष्ट खेळाडूची प्रतिष्ठा मिळवायची अाहे. त्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे मला फळ मिळेल, अशी प्रतिक्रिया युसेन बाेल्टने दिली.

अाता रिलेवर नजर
जमैकाच्या युसेन बाेल्टची अाता पुरुषांच्या ४ बाय १०० मीटरच्या रिलेवर नजर खिळून अाहे. या रिलेतही सुवर्णपदक जिंकण्याचा त्याचा प्रयत्न अाहे. त्यासाठी ताे सज्ज झाला अाहे. कारण, यातूनच त्याला अापल्या नावे तीन अाॅलिम्पिकमध्ये ९ सुवर्णपदकांची नाेंद करता येईल.
बातम्या आणखी आहेत...