आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंदना कटारिया महिला हॉकीची कर्णधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारताच्या १८ सदस्यीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्टार स्ट्रायकर वंदना कटारियाकडे भारतीय महिला संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या स्पर्धेत आशियाईतील पाच संघ जपान, भारत, चीन, कोरिया आणि मलेशियाचा समावेश आहे. वंदनाशिवाय सुनीता लकडाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

भारतीय संघात दोन गोलकीपर, पाच फॉरवर्ड, सहा मिडफिल्डर आणि पाच डिफेंडरचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल.

भारतीय संघ
सविता, रजली इतिमापरू, दीप ग्रेस एक्का, रेणुका यादव, सुनीता लकडा, हेनियालम लाल, राऊत फेली, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नवज्योत कौर, मोनिका,राणी, दीपिका, नवदीप कौर, पूनम राणी, अनुराधी राणी थोकचाेम, वंदना कटारिया, प्रीती दुबे, पूनम बाला.
बातम्या आणखी आहेत...