आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभव काळेचा प्रो-कबड्डीत ले पंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘कबड्डी, कबड्डी...पटक दिया.. ले पंगा, ले पंगा’ हे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील गाणे सर्वच देशवासीयांमध्ये चैतन्य भरत आहे. देशात दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या प्रो-कबड्डी लीगचे ते टायटल साँग आहे.

याच लीगमध्ये अमरावतीच्या युवा नवरंग मंडळाचा हुकमी खेळाडू अन् विदर्भाकडून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा गाजवणारा वैभव काळे आक्रमक रेड घालून मैदान दणाणून सोडत आहे. बंगळुरू बुल्सचा सदस्य असलेल्या वैभवने त्याच्या कारकीर्दीत १० राष्ट्रीय ज्युनियर व सीनियर स्पर्धा खेळल्या असून विदर्भाला चांगलाच लौकिक मिळवून दिला आहे.

त्यामुळे चाचणीसाठी गेल्यानंतर वैभवचा बहारदार व चपळ खेळ बघून बंगळुरू बुल्सने संघात समाविष्ट केले. विशेष बाब अशी की, उद्घाटनीय सामन्यात या संघाने बंगाल वाॅरिअर्सला पाणी पाजले.

अशी होते निवड
आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळाडूंची निवड होते. यंदा विदेशी खेळाडू सामील झाले. त्यांना प्रथम चाचणीसाठी आमंत्रित करण्यात आले. फ्रँचायझींकडून खेळाडूंची िनवड केली. यासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी व दर्जा बघून मानधन निश्चित हाेते.
बातम्या आणखी आहेत...