आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veerdhaval Khade Got Medal In 69th National Swimming Competition

वीरधवल, माना सर्वाेत्कृष्ट !, ६९ वी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा; महाराष्ट्राला मिळाली २९ पदके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकाेट - महाराष्ट्राचा अव्वल वीरधवल खाडे अाणि यजमान गुजरातची माना पटेलला सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन गाैरवण्यात अाले. या दाेन्ही खेळाडूंचा ६९ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे सत्कार करण्यात अाला. देशभरातील अव्वल ७०० खेळाडूंनी या स्पर्धेत नशीब अाजमावले.
या स्पर्धेत गुजरातची स्टार जलतरणपटू मानाने महिलांच्या ५० मीटर बॅकस्ट्राेक प्रकारात नव्या विक्रमाची नाेंद केली. तिने घरच्या मैदानावर १३ मायक्राे सेकंदाचा अापल्याच विक्रम माेडीत काढला. तिने शेवटच्या दिवशी ५० मीटर बॅकस्ट्राेकमध्ये ३०.२५ सेकंदांचा नवा विक्रम केला. यापूर्वी तिने अापल्या नावे २०१३ मध्ये ३०.३८ सेकंदांचा विक्रम नाेंदवला हाेता.

तरीही कर्नाटक सर्वोत्कृष्ट
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकूण २९ पदकांची कमाई केली. तसेच कर्नाटकला सर्वाेत्कृष्ट संघाचा बहुमान देण्यात अाला. या टीमने एकूण २८ पदकांची कमाई केली. यात ९ सुवर्णांसह ८ राैप्य अाणि ११ कांस्यपदकांचा समावेश अाहे.